मा मुख्यमंत्री,
एकनाथ शिंदे साहेब.
मंत्रालय, मुंबई
विषय :- डायलिसीस रुग्णांना मदत मिळणे बाबत
महोदय,
मा. मुख्यमंत्री साहेब, मी थोरात सिद्धांत संजय, राहणार, पाखरसांगवी, लातूर, गेली आठ वर्षे मी किडणी फेल हया दुर्धर आजाराने त्रस्त आहे. तेव्हापासून मी आपल्या महात्मा फुले योजने मार्फत मोफत डायलिसिस घेत आहे. या बद्द्ल मी महाराष्ट्र शासनाचा आभारी आहे, पण साहेब ही योजना फक्त आम्हाला जिवंत ठेवण्याच काम करत आहे, बाकी जो आमचा उदर्निवाह, गोळ्या, इन्जेक्शन, तपासण्या, या सगळ्यांचा खर्च आणि कसा करणार आमच्या मनात काम करण्याची तयारी आहे पण आम्ही बाहेर कसे पडणार, कारण हया डायलिसीस मुळे आमची हाडे दिसुळ झाली अहित, आणि स्वतःला कसे सावरती हे फक्त आम्हाला माहिती. तुम्ही आमच्या उपचारासाठी योजने मध्ये पाच लाख रुपये दिले खरे, पण ते आमच्या इतर खर्चासाठी उपयोगी नाही ना येोणार साहेब, आमचा उपचाराचा व उदर्निवाहाचा डोंगर योवढा मोठा आहे कि, आमच्या घरच्या व्यभिंग) चढणे अश्यक झाले आहे. साहेब आम्हाला पण जगायचं आहे, काही करून दाखवायचे आहे, पण कसं? या डायलिसिस ने आम्हाला जिवंत तर ठेवल आहे, पण बिनकामासाठी काहीच करू शकत नाही, माझी तुम्हाला तमाम डायलिसिस रुग्णांतर्फे एवडीच मागणी आहे की, आम्हाला मदत म्हणून प्रति महिना दिड हजार रुपये, घरबसल्या सरकारी व्यवसाय उपलब्ध करून घ्यावा, ज्याने आमचा इतर खर्च पूर्ण होईल, आणि आम्हाला रोजगार मिळेल, साहेब डायलिसिस करून आमचे टाडे दिसुळ झलित तसे तुम्ही आमची मदत करण्यास ठिसुळ नका होऊ, दीव विनंती .
आपलाच डायलिसीस रुग्ण सिद्धांत संजय थोरात
पाखर सांगवी ता. जि. लातूर



0 Comments