हज ला जाणाऱ्यांना ठिकाण बदलून देण्यासाठी शरद पवारांनी दिले अल्पसंख्यांक मंत्र्यांना पत्र. औसा शहराहुन विशेष प्रयत्न.

 हज ला जाणाऱ्यांना ठिकाण बदलून देण्यासाठी शरद पवारांनी दिले अल्पसंख्यांक मंत्र्यांना पत्र.

औसा शहराहुन विशेष प्रयत्न.


शेख बी जी






औसा.दि.16 संपूर्ण देशात गाजत असलेला प्रश्न हाज साठी लावलेली अधिकची रक्कम हा होय. यात्रेकरूंना हा भुर्दंड बसू नये यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत.पैकी अनेक जणांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन न्याय मागितला आहे.यापैकी काही जणांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला असला तरी प्रश्न अनुत्तरीतच असल्याचे चित्र दिसून येते. भारतातून एकूण 22 ठिकाणाहून हज यात्रेसाठी यात्रेकरू जाणार आहेत. औरंगाबाद शहराहून जाणाऱ्या हज यात्रेकरूनां तीन लाख 92 हजार इतका खर्च येणार आहे व मुंबईहून जाणाऱ्या हज यात्रेसाठी तीन लाख चार हजार रुपये खर्च येणार आहे.रकमेतील ही मोठी तफावत दूर व्हावी यासाठी शरद पवारांनी अल्पसंख्यांक मंत्रालयाला पत्र लिहून सांगितले आहे की हज यात्रेकरूनां  लागणारी ही अधिकची रक्कम कमी करावी किंवा यांना मुंबईहून जाण्यासाठी परवानगी द्यावी. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार साहेबांनी अशा प्रकारचे पत्र द्यावे अशी विनंती अल्पसंख्यांक नेत्यांनी केली होती.यात औसा शहरातील माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख तसेच मेहबूब शेख, बासिद शेख आदींनी विशेष प्रयत्न केला आहे. पवार साहेबांनी तात्काळ पत्र लिहून स्मृती इराणींना हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा असे पत्रात म्हटले आहे.






Post a Comment

0 Comments