सोलापूरच्या दंडोती, बागबान और जमादार यांना
राष्ट्रीय उर्दू शिक्षक कर्मचारी संघाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान
सोलापूर- नवी दिल्लीच्या राष्ट्रीय उर्दू शिक्षक कर्मचारी संघाच्यावतीने शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट सेवा बजावत असलेल्या शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संघाच्या तिसऱ्या वार्षिक सभेत सोलापूरच्या तीन शिक्षकांना राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्कार देण्यात आले. ज्यामध्ये बोरामणी येथील जिल्हा परिषद शाळेतील सहशिक्षिका सादिया दंडोती, महानगरपालिका उर्दू शाळा क्रं 3 चे अफरोज बागबान आणि महानगरपालिका उर्दू शाळा क्रं 2 चे इम्रान जमादार यांची निवड करण्यात आली होती. या निवड समितीने महाराष्ट्र, काश्मीर, कर्नाटक, ओडिशा, तेलंगाना, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश अशा विविध राज्यातील एकूण 200 शिक्षकांना अध्यापन सेवेसह सामाजिक सेवा बजावत असलेल्या शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
हा पुरस्कार सोहळा रविवार 29 ऑक्टोबर 2023 रोजी राजधानी दिल्लीतील गालिब अकादमी निजामुद्दीन दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी वसल अली गुजर यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेशाध्यक्ष खान आबिद अली यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी अलाहाबाद विद्यापीठाचे सालेहा रशिद, मौलाना डॉ. अब्दुलम लिक, दिल्ली मिल्ली कौन्सिलचे अध्यक्ष प्रा. स्वालेह चौधरी, जम्मू काश्मीर विद्यापीठाचे मुफ्ती मोहम्मद साजीद हुसैन, दिल्ली कौमी उर्दू शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वासिल गुर्जर, राज्याध्यक्ष आबेद खान, श्रीमती कनीज फातिमा, महताब यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात अलाहाबाद मौलाना आझाद विद्यापीठ आणि जामिया इस्लामिया विद्यापीठातील विशेष अतिथींच्या मार्गदर्शन लाभले.

0 Comments