उर्दू साहित्य संमेलन समिती
13 व 14 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यस्तरीय उर्दू बाल नाटय स्पर्धा
जागतिक किर्तीचे लेखक व दिग्दर्शक मुजीब खान (मुंबई), जफर मोहियोद्दीन (बँगलोर) उपस्थित राहणार.
सोलापुर (प्रतिनिधी )
अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समितीच्यावतीने दिनांक 13 व 14 नोव्हेंबर 2023 रोजी हुतात्मा स्मृति मंदीर येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय बाल नाटय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी जागतिक किर्तीचे लेखक व दिग्दर्शक मुजीबखान (मुंबई) व जफर मोहियोद्दीन (बँगलोर) यांचेसह महाराष्ट्रातील नाटय क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक नामवंत उर्दू नाटककार, लेखक व कवी हजर राहणार आहेत. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सोलापूर सह मुंबई, भिवंडी, मालेगाव, पुणे, रत्नागिरी व इंचलकरंजीसह एकुण 17 नाटके सादर होणार आहेत. दिनांक 13/11/2023 रोजी सकाळी ठिक 9.00 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन कर्नाटक राज्यातील बँगलोर येथे राहणारे सुप्रसिध्द लेखक व डायरेक्टर मा.जफर मोहियोद्दीन यांचे शुभहस्ते होणार असुन मुंबई येथील प्रसिध्द लेखक व दिग्दर्शक म.सलिम शेख तसेच औरंगाबाद येथील सुप्रसिध्द नाटय दिग्दर्शक डॉ.अस्लम शेख हे उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.00 वाजता बाल दिवसाची औचित्य साधुन मुंबई येथील नाटय क्षेत्रात जागतिक विक्रम करणारे लेखक व दिग्दर्शक मुजीब खान यांचे हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार असुन या कार्यक्रमासाठी सुप्रसिध्द लेखक व दिग्दर्शक जफर मोहियोद्दीन हे अध्यक्षस्थानी राहणार असुन अ.भा.नाटय परिषद मुंबईचे सदस्य विजय साळुंखे व नियामक मंडळ सदस्य सुम्मीत फुलमामडी प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ नाटकास प्रथम बक्षिस 51 हजार, द्वितीय बक्षिस 31 हजार, तृतीय बक्षिस 21 हजार तसेच उत्तेजनार्थ 11 हजार रोख तसेच स्मृति चिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे उत्कृष्ठ कलाकार, उत्कृष्ठ अभिनेता व अभिनेत्री, नैपत्य, दिग्दर्शक, प्रकाश योजना, उत्कृष्ठ बाल कलाकार यांना प्रत्येकी 5 हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह आणि सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे औचित्य साधुन अक्स नावाची स्मरणिका प्रकाशित केली जाणार आहे.
या पूर्वी सोलापूर शहरात 2008 साली तीन दिवसांचे अ.भा. उर्दू साहित्य संमेलन भरविण्यात आले होते. या संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, मुशायरा, जग प्रसिध्द गुलामअली यांचे महफिले-ए-गजल आदी भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये कवी गुलजार दहलवी, श्रीकृष्ण निजाम, बेकल उत्साही, गजल गायक गुलामअली आदी नामवंत लेखक, कवी, साहित्यिकांनी सहभाग घेतला होता. 2011 मध्ये समितीच्यावतीने दोन दिवसांचे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन आयोजित केले होते.
मागे ..2..
..2..
दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत अनुक्रमे सोशल हायस्कुलच्या वतीने मन्नु माय डॉल, एम.ए.पानगल हायस्कुलच्या वतीने कठपुतली, नुरुलाहुदा हायस्कुलच्यावतीने आउट ऑफ कवरेज एरीया, दि प्रोग्रेसिव्ह हायस्कुलच्यावतीने कबरें खोद रहें हैं, सर सय्यद हायस्कुलच्या वतीने मिसाली दोस्ती, शमा स्कुलच्या वतीने दादी अम्मा मान जाव, खाजा बंदानवाज हायस्कुलच्यावतीने चमकते तारे, सोशल हायस्कुल विडी घरकुलच्यावतीने कोट, डॉ.ए.पि.जे.अब्दुलकलाम स्कुलच्यावतीने ईद गाह तर पी.एमसी.स्कुल कोंढवा बदरुग पूणे यांचेवतीने उजाले के दाग हि नाटके सादर करण्यात येणार आहेत. तसेच दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अनुक्रमे पटेल हायस्कुल मुंब्रा यांचेवतीने बस इतनासा ख्वाब, रफीयोद्दीन स्कुल भिवंडी यांचेवतीने रौशन आँखे, नॅशनल हायस्कुल इचलकरंजी यांचेवतीने इन्सानियत का तमाशा, अँगलो उर्दू गर्ल्स हायस्कुल पुना यांचेवतीने जमीन की फरयाद, रॉयल गर्ल्स हायस्कुल मिरा रोड मुंबई यांचे वतीने विबग्योर खुद की खोज तर अंजुमने इस्लाम गर्ल्स हायस्कुल मुंबई यांचेवतीने पाँईट ऑफ रिटर्न हि नाटके सादर करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्राच्या विविध भागातुन येणाऱ्या नाटय कलाकार, लेखक व दिग्दर्शक यांची राहण्याची, भोजनाची व नाटकात सहभाग घेण्याऱ्या सर्व कलाकाराची मेकअपची सुविधा संस्थेतर्फे करण्यात येत आहे. मराठी, उर्दू, हिंदी, कन्नड, तेलगू अश्या बहुभाषा एकत्रपणे व गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या आणि विविधतेतून एकतेचा संदेश देणाऱ्या सोलापूरच्या पावन नगरीत हे नाटय स्पर्धा भरविताना विशेष आनंद होत आहे. महाराष्ट्रातील अनेक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा यामध्ये समावेश असणार आहे. या स्पर्धेनिमित्त विविध नाटकातुन अनेक सामाजिक संदेश दिले जाणार असुन सोलापूरातील नाटय रसिकांना मेजवानी मिळणार असुन नाटय रंगभुमी समृध्द होण्यास मदत होईल.
दरम्यान, बाल नाटय स्पर्धेची तयारी संस्थेचे अध्यक्ष व माजी महापौर यु.एन.बेरिया यांच्या मार्गदर्शनासाठी समितीचे संयोजक सय्यद इकबाल, विकार शेख, अशलाक शेख, प्रा.बशीर परवाज, अशफाक सातखेड, शफी कॅप्टन, अय्युब नल्लामंदु, अ.जब्बार शेख, मो.रफिक नल्लामंदु, म.हुसेन बक्षी, हारुण बंदुकवाला, मेहजबीन मुल्ला, तसेच स्मरणिका समितीचे नासर आळंदकर, रफिक खान, इरफान कारीगर, याकुब मंगलगिरी, प्रा.रियाज वळसंगकर, कनिजफातिमा कांचवाला, जावीद उस्ताद व विविध समित्यांचे प्रमुख कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
ऍड.यु.एन.बेरिया
अध्यक्ष

0 Comments