राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मराठी साहित्य संमेलन मोठ्या थाटाने संपन्न
--- - - - - - - - - - - - - - - - - - - -
साहित्य समाजचा आरसा असतो
♦️संमेलनाध्यक्ष डॉ अर्जिनबी युसूफ शेख यांचे मत
-- - - - - - - - - - - - - - - - -






सोलापूर - अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद, सोलापूर व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था बोल्डा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ जानेवारी २०२४ रविवार रोजी राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य साहित्य संमेलन सोशल महाविद्यालयात मोठ्या थाटाने संपन्न झाले.
सचिव अय्यूब नल्लामंदू यांनी कुरान पठन करून संमेलनाची सुरुवात केली यानंतर डॉ अजीज नदाफ यांच्या हस्ते वृक्षाला जल अर्पण करून उद्घान करण्यात आले.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील सुप्रसिध्द साहित्यिक , लेखिका प्रा. डॉ. अर्ज़िनबी युसुफ शेख हे होते.
यावेळी मंचावर स्वागताध्यक्षा सौ. सुरैय्या जहागीरदार , डॉ. अजीज नदाफ, मुख्य संजोक प्राचार्य इ जा तांबोळी , अय्यूब नल्लामंदू , प्राचार्य शकील शेख ,अनिसाशेख ,अॅड. हाषम पटेल, मुस्लीम कबीर, कवी मुबारक शेख , सय्यद अलाऊद्दीन आष्टी , सायराबानू चौगुले रत्नागीरी , खजीनदार हसीब नदाफ इ उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते इंतेखाब फराश संपादित "स्पंदन" आणि इ .जा तांबोळी व अय्यूब नल्लामंदू संपादित काव्य संग्रह "गुलदस्ता " व खाजाभाई बागबान लिखित "पाऊलखुणा" सायराबानू चौगुले लिखित "वैचारिक कवडसे" या काव्य संग्रहाचे प्रकाशन झाले .
यानंतर बेन्नूर फौडेशनच्यावतीने मुबारक शेख यांना फखरोदीन बेन्नूर स्मृती पुरस्कार , तर फराश फौंडेशन तर्फे प्राचार्य तांबोळी यांना समाजरत्न पुरस्कार आणी शाहिदा सरयद यांना युगस्त्री फातीमाबी शेख साहित्य पुरस्कार -२४ सन्मान पूर्वक देण्यात आले.
शफी बोल्डेकर यांनी प्रास्ताविक केले स्वागताध्यक्क्षा डाँ .सौ सुरैय्या जहागीरदार यांनी सर्वांचे स्वागत करत शाल बुके देऊन सत्कार केले व आपल्या स्वागत अध्यक्ष भाषणचा सारांश सादर केले. दोन्ही संस्थेच्यावतीन प्रस्ताविक डॉ. तांबोळी व शफी बोल्डेकर यांनी केले .
या नंतर संमेलनाध्यक्ष अकोल्याचे डॉ. अर्जिनबी शेख म्हणाल्या - साहित्य हे समाजाचा आरसा असतो , समाजात जे काही घडतं ते साहितयात प्रतिबिंबिंत होते आणी साहित्यात ज्या घडत नाही अर्थातच सत्य मांडण्यात येत नाही. तो साहित्य समाजाला वाचवू शकत नाही, समाजाला आरसा दाखवू शकत नाही, समाजात सकारात्मक बदल घडवू शकत नाही आणि असला साहित्य इतिहास घडवू शकत नाही.
डॉ. अर्जिनबी शेख पुढे म्हणाल्या -भारतातील मुख्य समस्या गरीबी
आणि आर्थिक बळकटी करिता योग्य मार्गदर्शनाचा अभाव असत्या कारणाने या कडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे पती आर्थिक स्वरूपात. सक्षम नसल्याचे कारणाने उदभवणारी आर्थिक तंगी व महिलांची होणारी तारेवरची कसरत चिंतेची बाब आहे , महिलाच्या हाताला काम मिळाले कि आर्थिक तंगी दूर होण्यास मदत मिळते
मुस्लीम महिलान पुरुषाकडून पदोपदी मिळालेल्या सहकार्य मुस्लीम महिलाच्या जीवनात साफल्यपूर्ण आनंदी बहर आणू शकते मुस्लीम समाजाच्या उत्कर्षात अखंड भर घालु शकते .
सुत्रसंचलन डॉ. महंमद शेख यांनी केले तर आभार अय्यूब नल्लामंदू मांनी मानले .
दुपारच्या परिसंवाद प्राचार्य शकील शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यासत्रात नसीम जमादार कोल्हापुर , हसीब नदाफ , अय्युब नल्लामंदू , तहसीन सय्यद पुणे , निलोफर फणीबंद , रजिया जमादार अक्कलकोट हे सहभागी होवून . " स्त्री मुस्लिम मराठी साहित्यिकांची दिशा " या विषयवर आपले प्रकट विचार मांडले सुत्र संचलन प्रा सौ रईसा मिर्जा यानी केल
♦️ रंगतदार झाला कवी संमेलन
मुबारक शेख यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात , साबीर सोलापूरी , साईनाथ राहटकर नांदेड , मोहिदीन नदाफ , शेख जाफर अ हमीद शेख , जमील अन्सारी नागपूर ' शैंलेंद्र पाटील , कल्याण राऊत , शाहीदा सयद , अड इकबाल , अनिता वलांडे , सय्यद तहसीन (सर्व लातूर ) . रामचंद्र गुरव , अॅड रामचंद्र पाचुनकर ( पुणे ) सारिका देशमुख ( उस्मानाबाद ) मोहिदीन नदाफ बार्शी , राणी धनवे मंगळवेढा , सिकंदर मुजावर मोहोळ . , इम्तियाज तांबोळी फलटण , जाकीर तांबोळी , सफुरा तांबोळी
(वैराग ) एम ए रहीम (चंद्रपुर )
राहुल राजारामपुरे ( इचलकरंजी ) सुमीत हजारे (ठाणे) गौस पाक शेख (पालघर ठाणे ) प्रकाश सनपुरकर , डॉ . रेशमां पाटील , आनंद घोडके ' सोलापुर , गौसपाक मुलाणी , सुर्वणा तेली (सांगोला ) शेख चिकतीकर नांदेड , निलोफर फणीबंद , सौ रजिया जमादार ( अक्कलकोट ) सौ महमूदा शेख देहू , भुपेंद्र आल्हाट ( तळेगांव दाभोडे ) या कवींनी आपल्य रचना सादर करून वाह - वाह मिळविली याचे सुत्र संचलन अँड उमाकांत आदमाने (पुणे) व सौ नसीमा जमादारनी उत्तम रित्या केले .
ॲड. हाषम पटेल लातूर यांच्या अध्यक्षतेखाली समारोप झाला यात मुस्लीम कबीर लातूर, कवी शफी बोल्डेकर यांनी आपले विचार व्यक्त केले सुत्रसंचलन खाजाभाई बागवान यांनी केले तर आभार इंतेखाब फराश मानले.
एक दिवसीय फातीमांबी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी मजहर अल्लोळी , अनिसा सिकंदर शेख , डाॅ. महंमद शेख , इकबाल बागबान , अबुबकर नल्लामंदू , फारूक कोतकूंडे 'यांनी खूप परिश्रम घेतले
यावेळी बीडचे काझी मखदुम, .औरंगाबादचे डॉ. सिराज खान आरजु, पठाण ए पठाण , अय्युब खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेख पाशाभाई, माजी नगरसेवक बबलू गायकवाड, शिवसेनेचे शरद कोळी , मोहसीन मैंदर्गीकर , इंजिनियर जहागीरदार , डॉ. शफी चोबदार , अब्दुल मन्नान शेख , अन्वर कमिशनर , प्रा. बी एच करजगीकर , शगुफ्ता दंडोती, सय्यद इकबाल, अबरार नल्लामंदू आदी उपस्थित होते.
0 Comments