श्री रामनाथ विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
आलमला. श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अलमला येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी विद्यालयांमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मुख्याध्यापिका सौ अनिता पाटील यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण केला तसेच बाल शिवबा ,जिजाऊ यांच्या भूमिकेतील विद्यार्थिनीने शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून अभिवादन केले .आणि महाराष्ट्र गीत गाऊन वातावरणामध्ये नवचैतन्य निर्माण केले प्रभात फेरी काढली व सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले याप्रसंगी विद्यालयातील पर्यवेक्षक श्री पी सी पाटील क्रीडा शिक्षक श्री रंगनाथ आंबुलगे, शिक्षक शरण धाराशिवे,भास्कर सूर्यवंशी ,प्रशांत हुरदळे, फाजल फैयाज, ईश्वर वाडकर ,शाम कोकाटे, शिरीष धाराशिवे ,सौ निलंगेकर एस एस, सौ उकरडे डी आर ,प्रा मुळे पी के प्रा. दांडगे जी बी सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments