बचुटे ईशांत, शेख आरेफ, शेख लईख़ यांचे इयत्ता दहावीत घवघवीत यश

बचुटे ईशांत, शेख आरेफ, शेख लईख़ यांचे इयत्ता दहावीत घवघवीत यश


बीड (प्रतिनिधी) - शहरातील बचुटे ईशांत मनोज याने 91.60, शेख आरेफ अशफाक याने 86.80 आणि शेख लईख़ युसूफ़ याने 75.80 टक्के गुण मिळवून इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
बचुटे ईशांत चे आई-वडील सौ व श्री मनोज बचुटे हे सहशिक्षिका व सहशिक्षक आहेत तसेच शेख आरेफ चे आई-वडीलही सहशिक्षिका व सहशिक्षक आहेत. शेख लईख़ हा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांचा मुलगा आहे. तिघांनीही इयत्ता दहावीत मिळविलेल्या घवघवीत यशामुळे त्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे (नाना), एम.ए.रऊफ (दादा), मनोज बचुटे सर, शेख मज़हर (ताया), शेख अशफाक सर आणि एस.एम.युसूफ़ यांनी तिघांचेही अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी हृदयी शुभेच्छा दिल्या आहेत.


Post a Comment

0 Comments