व्हिक्टर युथ फेडरेशन तर्फे वीस जोडप्यांचे निकाह थाटात संपन्न- - - - - - - - - -सामुदायिक विवाह काळाची गरज - शहर काजी अमजद अली

व्हिक्टर युथ फेडरेशन तर्फे 
वीस जोडप्यांचे निकाह थाटात संपन्न
- - - - - - - - - -
सामुदायिक विवाह काळाची गरज - शहर काजी अमजद अली
- _ _ _ _ _ _ _ _ _



सोलापूर - व्हिक्टर युथ फेडरेशच्या वतीने गेल्या १९ वर्षा पासून मुस्लीम समाजाचे सामुदायिक विवाहचे आयोजन केले जाते . यंदा ही २० जोडप्यांचे निकाह ३१ / ५ / २०२४ रोजी संध्याकाळी पानगल प्रशालेच्या पटांगणात मोठया थाटाने संपन्न झाले ,

 शहर काजी मुफ्ती अमजद अली नीं " कबूल किया मैं ने उसको और उसके महेर को " असा वरांकडून कबुली जवाब घेऊन निकाह लावला .

या वेळी शहर काजीनीं व्हिक्टर युथ फेडरेशनच्या या उपक्रमाचे कौतुक करत याला काळाची गरज आहे हे पुण्याचे कार्य सतत व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली .

संस्थेचे अध्यक्ष हाजी सत्तार नदाफ ,  सचिव कादर तांबोळी नीं निकाह मधील गवाह व वकील  म्हणून आपली जबाबदारी पाड पाडली तर उपाध्यक्ष जावीद काजी , खजीनदार इस्माईल डीके , बखतीयार सय्यद , शकील बागबान नीं  उपस्थितांचे व देणगीदारांचे बुके देऊन स्वागत केले . हा भव्य विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी  सह सचिव मकसूद शेख ज्येष्ठ संचालक  रियाज शाहजी , अय्यूब नल्लामंदु , शकील बागबान , जाकीर शेख , साजीद शेखनी  खूप परिश्रम घेतले . 

तसेच या वेळी सलीम मुजावर , जुबेर कुरेशी , तौफीक भाई , कय्यूम शेख , इब्राहीम सालार , इम्तियाज कमिशनर , पापा कुरेशी , शोएब चौधरी ,जावीद बागबान , युनूस उस्ताद , मुबीन बशीर सय्यद , मुजमील तांबोळी , मुश्ताक कुरेशी , नसीम शेख , सलीम शेख , अशफाक कल्याणी , अ कादर मुजावर , सत्तार पहलवान , बुरहान बोहरी व विजापूर वेस यंग ग्रुप ने हजेरी लाऊन सर्वतपरी सहकार्य केले

🟣🟡🟢

Post a Comment

0 Comments