मानवाच्या बरोबर पशू पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या मानवतावादी अहिल्याबाई सर्वांना वंदनीय आहेत : हाजी मतीन बागवान

मानवाच्या बरोबर पशू पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या मानवतावादी अहिल्याबाई सर्वांना वंदनीय आहेत : हाजी मतीन बागवान
            सोलापूर - मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त माजी महापौर आरिफ शेख आणि उद्योजक मुबीन सय्यद यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

       अहिल्याबाई आपल्या राज्यातील गरिबांसाठी धर्मशाळा, अन्न क्षेत्र उभा केले, वाटसरू साठी दुतर्फा वृक्ष लागवड केले, जागोजागी पशू पक्ष्यांसाठी पाणवठे कुरण निर्माण केले. लोककल्याणकारी आणि मानवतावादी अहिल्याबाई सर्वांना वंदनीय आहेत असे मत हाजी मतीन बागवान यांनी व्यक्त केले.

            याप्रसंगी मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शफीक रचभरे,राजू हुंडेकरी,  जावेद बद्दी, बशीर सय्यद, रिजवान शेख, अमजद पठाण, सुलेमान चामाकोर, कादर भागानगरी , वाहिद तांबोळी, रुस्तुम शेख,  कय्युम मोहळकर गफार खान, माजिद वागदुरीकर, जैद बागवान, रिजवान पैलवान आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments