अवघड व किचकट प्रक्रियेनंतर डॉ. मोमीन यांनी केले रुग्णाला त्रास मुक्त
बीड (प्रतिनिधी) - शहरातील मोमीनपुरा भागात असलेल्या ए.के. डेंटोफेशियल या रुग्णालयाचे संचालक डॉ. मोमीन फजलुल्लाह मुहम्मद मुस्तफा यांनी एका रुग्णाचे तोंड आवश्यक प्रमाणात उघडत नसतानाही मोठ्या कुशलतेने अवघड व किचकट प्रक्रियेनंतर शस्त्रक्रियेविना दाढ व मूळ काढून रुग्णाला त्रास मुक्त केले आहे. यामुळे रुग्णाने डॉक्टरांचे आभार व्यक्त केले आहे.
दाढ दुखत असताना रुग्णाचा जीव अक्षरशः कासावीस होतो. हा त्रास दूर करण्यासाठी काय करावे आणि काय नाही असे होऊन जाते. त्यातही दुखरी दाढ काढण्याकरिता साधारण २० ते २५ एमएम तोंड उघडणे आवश्यक असते परंतु दाढ दुखणाऱ्या शेख सलीम इमामुद्दीन या रुग्णाचे तोंड फक्त १० एमएम उघडत होते. एवढे कमी तोंड उघडत असेल तर रुग्णाची शस्त्रक्रिया करून दाढ काढावी लागते परंतु एवढ्या कमी प्रमाणात तोंड उघडत असूनही शहरातील मोमीनपुरा भागात असलेल्या ए.के. डेंटोफेशियल या रुग्णालयाचे संचालक डॉ. मोमीन फजलुल्लाह यांनी मोठ्या अवघड व किचकट प्रक्रियेनंतर शस्त्रक्रियेविना संबंधित रुग्णाची दाढ व मूळ यशस्वीरित्या काढले आणि रुग्णाला त्रास मुक्त केले. यामुळे रुग्ण शेख सलीम इमामुद्दीन यांनी ए.के. डेंटोफेशियल चे अनुभवी डॉ. मोमीन फजलुल्लाह आणि डॉ. अब्दुल खादर अन्सारी यांचे आभार व्यक्त केले आहे.
0 Comments