३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नजीबोद्दीन पटेल सेवानिवृत्त

३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नजीबोद्दीन पटेल सेवानिवृत्त 


औसा (प्रतिनिधी) - औसा येथील हज़रत सुरत शाह उर्दू शाळेतील कारकून नजीबोद्दीन पटेल हे ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक ३० जून २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले. 
या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात फ़खरुद्दीन अली अहेमद एज्युकेशन सोसायटीचे  मुख्याध्यापक मुहम्मद शफीउद्दीन पटेल, झाकीर जरगर यांनी नजीबोद्दीन पटेल यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन शेख मुजीब शब्बीर आणि आभार प्रदर्शन बदीउद्दीन पटेल यांनी केले. शाळेकडून मान्यवरांच्या हस्ते नजीब पटेल यांना भेट वस्तू प्रदान करण्यात आल्या. यावेळी मोइज़ पटेल, मुहम्मद अब्दुल गनी, रजिया बाजी, शेख एम.एम.बाजी, शबाना मुंगले बाजी, शगुफ़्ता मन्यार बाजी, यासिर अराफत काझी, जिलानी काझी यांच्यासह सर्व शिक्षकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments