सोलापूर- जुनी मील वीज कार्यालयात महावितरण ग्रामीण विभागात सहायक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या जुबेर शेख यांना 'भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या उत्तम अभियंता' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वीज महावितरण विभागाचे अधीक्षक अभियंता सुनील माने, ग्रामीण पोलिस विभागातील वरिष्ठ मोटार यांत्रीक अविनाश शिंदे, बांधकाम विभागाचे अभियंता संजय माळी, नसीमा पठाण, विजय पाटील, बाळासाहेब वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
जुबेर शेख हे अक्कलकोट शहर शाखा कार्यालय येथे २.६ वर्षे आणि जोडबसवण्णा चौक येथे पाच वर्षे येथे सहाय्यक अभियंता म्हणून उत्तमरित्या सेवा बजावली. त्यांनी एक उत्तम शिक्षक म्हणूनपण सोलापूर शहरातील दोन अभियांत्रिकी महाविद्यालयात सहा वर्षे विद्यार्थ्यांना शिकविले. या अगोदर लायन्स क्लब ऑफ सोलापूर क्लासिकतर्फे आदर्श अभियंता पुरस्कार सप्टेंबर २०२० मध्ये देऊन गौरविण्यात आले. हे पुरस्कार मिळाल्याबद्दल जुबेर शेख यांचे समाजात व त्यांच्या कुमठे गावात त्यांचे मित्र मंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले.
0 Comments