चांगले शिक्षणामुळेच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो : प्रा. शाबोद्दीन शेख* *समाजसेवक इक्बाल बागवान, तौफिक नदाफ व अ. रहेमान यांचा विशेष सन्मान*

 *चांगले शिक्षणामुळेच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो : प्रा. शाबोद्दीन शेख*

*समाजसेवक इक्बाल बागवान, तौफिक नदाफ व अ. रहेमान यांचा विशेष सन्मान*





सोलापूर- जीवनात यशस्वी व्हायचा असेल आणि भविष्यात चांगल करिअर घडवायचा असेल तर आपण चांगले शिक्षण घेऊन पुढे जाऊ शकतात व आपल्या जीवनातील लक्ष गाठू शकतात, असे विचार रयत शिक्षण संस्थेचे माजी प्रा. शाबोद्दीन शेख यांनी गैबीपीर उर्दू प्रा. स्कूलमध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. 




यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुरहान, संस्थेचे अध्यक्ष हाजी के.बी. नदाफ समाजसेविका सलिमाबी शेख,  समाजसेवक इकबाल बागवान,  मोइनुद्दीन मुतवल्ली,  जमीर कोतकुंडे,  पत्रकार तौफिक नदाफ,  सादिक नदाफ,  सतार तुरूप, हाफीज इस्माइल शेख, भिम शक्तिचे सुबोध वाघमोडे, राजाभाऊ कदम हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका वहिदाबी शेख यांनी भूषविले होते.



प्रारंभी पाहुण्याचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक अ. मजीद शेख यांनी केले. संस्थेच्यावतीने समाजसेवक इकबाल बागवान, पत्रकार तौफिक नदाफ  व  गायक अ. रहमान यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला . यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच सुबोध वाघमोडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष वहिदाबी शेख यांनी आपले मनोगत व्याक्त केले.

कार्यकम यशस्वी करण्यासाठी निलोफर शेख, तहसीन चाँदा, शबाना जमादार, अकबर मुतवल्ली, सलमा नदाफ, शब्बीर शेख, आफरीन शेख, सालेहा शेख, यासिनबी शेख आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मसरत शेख यांनी तर आभार अ. मजीद शेख यांनी मानले.

Post a Comment

0 Comments