लातूर फार्मसीत सायबर सुरक्षा जागरूकता

 लातूर फार्मसीत सायबर सुरक्षा जागरूकता


J



लातूर: श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात महाराष्ट्र शासन सायबर आणि क्विक हिल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने राज्यव्यापी  उपक्रम राबविण्यात आलेला आहे. आधुनिक काळात सायबर हत्या विरुद्ध संरक्षण मिळावे ,लोकांना ऑनलाइन सुरक्षित वर्तनाबद्दल जागरूकता करणे ,मानवी चुका कमी कराने ,गोपनीय माहिती दूरभावना पूर्ण टाळणे, डाऊनलोड विनाकारण न करणे, ऑनलाईन शेअर केलेल्या संवेदनशील माहितीची संरक्षण करणे अशा अनेक तंत्रज्ञान युगामध्ये चुकीच्या कारणामुळे गोपनीय माहिती विनाकारण पसरले जाऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना व समाजातील लोकांना या सायबर सुरक्षा जागरूकता महत्त्वाचा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. सायबर सुरक्षा जागरूकतेचे माहिती देण्यासाठी आलेल्या प्रतिनिधी पटेल रेमशा व दावणगावे मेघा छत्रपती राजश्री शाहू महाविद्यालय लातूर तसेच उपस्थित संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे,प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला प्रा. अतुल कदम प्रा.भागवत सोमवंशी प्रा.आदिनाथ पाटील प्रा.माधुरी पोळकर प्रा.सुप्रिया जाधव प्रा. प्राजक्ता जाधव प्रा.शबनम शेख आदी शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments