शेतकरी, व्यापारी,व वाहन चालकांचा औसा तहसिल कार्यालयावर मूक मोर्चा..


शेतकरी, व्यापारी, वाहन चालक,कुरेशी समाजावर होणा-या अन्याय -अत्याचाराच्या विरोधात औशात मूक मोर्चा..


औसा प्रतिनिधी 



 तथाकथित गोरक्षकांकडून होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठीऔसा येथे सोमवारी कुरेशी समाजाने एक भव्य मूक मोर्चा काढला. या मोर्चात हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपली एकजूट दाखवून दिली.

​ किल्ला मैदान येथून सुरू झालेला हा मोर्चा जलालशाही चौक, गांधी चौक,ते जामे मस्जिद चौक ते तहसील कार्यालयावर पोहोचला. 



​मोर्चाच्या शेवटी झालेल्या सभेत अनेक वक्त्यांनी गोरक्षकांकडून होणाऱ्या अन्यायावर तीव्र संताप व्यक्त केला. जनावरांच्या खरेदी-विक्री आणि वाहतुकीदरम्यान होणारी हिंसा थांबवावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच, मॉब लिंचिंग प्रकरणांमध्ये कठोर कारवाई, मुस्लिम खाटीक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, जनावरांच्या वाहतुकीसाठी कायद्यात सुधारणा, नवीन स्लॉटर हाऊसची निर्मिती आणि पीडित कुटुंबांना नुकसानभरपाई अशा प्रमुख मागण्या शासनाकडे सादर करण्यात आल्या.




​या मोर्चात जमिअतुल कुरेशचे पदाधिकारी, व विविध पक्षाचे नेते विविध संघटनाचे पदाधिकारी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, काही फलकांवर 'गोमातेचे रक्षण झालेच पाहिजे' असे आवाहनही करण्यात आले होते. मोर्चाच्या शेवटी, लोकशाही मार्गानेच हा लढा पुढे नेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.




Post a Comment

0 Comments