इस्लाम धर्माचे प्रेषीत हजरत मुंहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्तरक्तदान शिबिर 31 रक्तदात्यांनी केले रक्तदान..
औसा प्रतिनिधी
संपूर्ण जगाला शांतीचा आणि एकतेचा संदेश देणारे
इस्लाम धर्माचे प्रेषीत हजरत मुंहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे औचित्य साधून औसा येथील साहिल भैय्या सय्यद मित्र परिवाराच्या वतीने अनावश्यक बाबींना फाटा देत ईद -ए -मिलादुन्नबी निमित्त रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून हे इबादत आणि जिवनदानही आहे.या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्या अनुषंगाने औसा शहरातील हसीना ऊर्दू शाळा, खडकपुरा औसा येथे 31 अॉगस्ट 2025 रविवार रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत रक्तदान शिबीर कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी....
कॉग्रेसचे कमिटीचे शहराध्यक्ष अजहर भैय्या हाश्मी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, अँड मजहर शेख, मुजम्मील शेख ,खाजाभाई शेख, नियामत लोहारे, उमर भाई पंजेशा,मुस्लिम भिम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चांदभाई लोणे,नदीम सय्यद, , आदिच्या प्रमुख उपस्थितीत हा रक्तदान शिबीर कार्यक्रम घेण्यात आला.या शिबिरामध्ये 31 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले. रक्तदान केलेल्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.या रक्तदान शिबिरात संजिवनी ब्लड सेंटर लातुचे टिमने सहकार्य केले.हा रक्तदान शिबीर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी साहिल भैय्या सय्यद मित्र परिवार चे साद चाऊस,अशरफ सय्यद आदि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

0 Comments