मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त* *सोशल महाविद्यालयात 110 रक्तदात्यांचा रक्तदान*

 *मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त*

*सोशल महाविद्यालयात 110 रक्तदात्यांचा रक्तदान*





सोलापूर : रक्तदान म्हणजेच जीवनदान” या उदात्त संदेशाला प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा एक सामाजिक व मानवतावादी उपक्रम सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालयामध्ये मोहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलादुन्नबी)च्या औचित्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे रक्तदान शिबिर सोशल महाविद्यालय, प्रोफेट फॉर ऑल, एचडीएफसी बँक आणि अतहर ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकूण ११० रक्तदात्यांनी आपल्या रक्तदान केले.

या शिबिरात महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, क्रीडा विभागातील खेळाडू तसेच एन.एस.एस. स्वयंसेवक आणि एन.सी.सी. कॅडेट्स यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 

प्रारंभी शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आय. जे. तांबोळी यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात रक्तदानाचे महत्व अधोरेखित करताना सांगितले की, “आपल्या एका थेंब रक्तामुळे कोणतेही व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. हा केवळ समाजोपयोगी उपक्रम नाही तर जीवनदान देणारे एक पवित्र कार्य आहे. विद्यार्थी आणि कर्मचारी वर्गाने घेतलेली ही पुढाकार भावना खरोखरच प्रेरणादायी आहे.”

राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक नारायणकर यांनी एन.एस.एस. स्वयंसेवकांच्या कष्टाचे कौतुक करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची जाणीव जागवणे हीच एन.एस.एस.ची खरी ताकद आहे.”

एन.सी.सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. गॉस अहमद शेख यांनी एन.सी.सी. कॅडेट्सच्या सहभागाचे कौतुक करताना “देशसेवेबरोबरच समाजसेवा हीदेखील खरी जबाबदारी आहे” असे सांगितले. क्रीडा विभाग प्रमुख डॉ. मुश्ताक शेख यांनी सर्व खेळाडूंच्या उत्साहाचे सहभाग नोंदविल्याबद्दल विशेष अभिनंदन केले.

या शिबिरास उर्दू विभाग प्रमुख डॉ. शफी चोपदार, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. आसमा खान, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. जैनुद्दीन मुल्ला, भूगोल विभाग प्रमुख डॉ. सचिन राजगुरू, प्रा. राहिसा मिर्झा, प्रा. वाहिद जमादार, प्रा. एम. डी. शेख, प्रा. टी. बी. लडफ, प्रा. तसलीम वड्डो तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. जैनुद्दीन पटेल व प्रा. इन्नुस शेख उपस्थित होते. तसेच एचडीएफसी बँकेचे उमर विजापुरे, इकबाल मुजावर यांचाही मोलाचा सहभाग होता.

अतहर ब्लड बँकेच्या वैद्यकीय पथकाने रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडली. रक्तदात्यांची तपासणी करून सुरक्षितरीत्या रक्तदान पार पाडले गेले. प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र आणि पौष्टिक अल्पोपहार देऊन गौरविण्यात आले.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी एन.एस.एस. स्वयंसेवक, सर्व विभागांचे सहकार्य आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग महत्त्वाचा ठरला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीपक नारायणकर यांनी केले. या रक्तदान शिबिरातून महाविद्यालयाने समाजसेवा, मानवता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवला. “रक्तदान म्हणजे जीवनदान” हा प्रभावी संदेश या शिबिरातून समाजात पोहोचला असून, आगामी काळातही असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments