शिक्षक दिनानिमित्त मनपा मुलांची उर्दू शाळा क्र. ३ मध्ये पारितोषिक वितरण

 *शिक्षक दिनानिमित्त मनपा मुलांची उर्दू शाळा क्र. ३ मध्ये पारितोषिक वितरण*




सोलापूर : मंगळवार बाजार, जोडबावी पेठ येथील मनपा मुलांची उर्दू शाळा क्र. ३ मध्ये दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने एच. एम. सामाजिक संघटना, मित्र नगर, सोलापूरतर्फे अचानक शाळेला भेट देऊन सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हुसेन मौलासाब बागवान होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक व समाजसेवक प्रथमेश कोठे, सादिक हुंडेकरी, हुसेनबाषा शेख, फुरकान रामपूर मौलाना, हाफिज मुतव्वली तसेच माजिद बगवान उपस्थित होते.

यावेळी प्रथमेश कोठे यांनी सांगितले की, “खऱ्या अर्थाने समाजाला घडविण्याचे कार्य शिक्षक करत असून अशा शिक्षकांचीच समाजाला खरी गरज आहे. त्यांच्या योगदानामुळे समाजामध्ये परिवर्तन घडू शकते.” 



कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापिका जबिन मुल्ला यांनी केली तर सूत्रसंचालन नाझिया शेख यांनी केले.

या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका तबस्सुम शेख, तसेच शिक्षक नाझिया शेख, महबूब्बी शेख, सनोबर शेख, शबनम नदाफ, अलमास पीरजादे आणि बालवाडी शिक्षिका बीबी हाजरा, सुनीता पवार यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या सन्मानामुळे शिक्षकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले आणि कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.




Post a Comment

0 Comments