लातूर फार्मसीत जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा
लातूर:श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिन २५ सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे,प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला प्रमुख उपस्थित होते. जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. फार्मासिस्ट प्रतिज्ञा,रॅली, वृक्ष लागवड,चेस- कॅरम स्पर्धा, नॅशनल ऑनलाईन पोस्टर प्रेझेंटेशन,ऑनलाइन फार्मा क्वीज कॉम्पिटिशन हे उपक्रम महाविद्यालयात घेण्यात राबविण्यात आले. यावर्षीचे ब्रीदवाक्य "थिंक हेल्थ थिंक फार्मसीस्ट" हे असून विद्यार्थ्यांनी जनप्रबोधनपर घोषवाक्य देऊन उस्फूर्तपणे रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी प्रा.अतुल कदम, प्रा.भागवत सोमवंशी प्रा.आदिनाथ पाटील प्रा.माधुरी पोळकर,प्रा.सुप्रिया जाधव. प्रा.मनकरना कराळे,प्रा.स्नेजा भालेराव, प्रा.प्राजक्ता जाधव आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.





0 Comments