*सय्यद युसुफ तानेशा पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त औशीत मोफत होमिओपॅथिक शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
औसा : मरहूम सय्यद युसुफ तानेशा पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त औसा शहरातील लाईफ लाईन होमिओपॅथिक क्लिनिक आणि औसा तालुका होमिओपॅथिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत होमिओपॅथिक शिबिराचे आयोजन करण्यात आले.
डॉ. जिलानी पटेल यांच्या पुढाकाराने 13 सप्टेंबर रोजी मेन रोडवरील क्लिनिकमध्ये पार पडलेल्या या शिबिरात एलर्जी, दमा, जुनाट सर्दी, त्वचा विकार, थायरॉईड, संधीवात, मूळव्याध, केस गळणे अशा विविध आजारांवर मोफत तपासणी करण्यात आली. रुग्णांना मोफत औषधे आणि गोळ्याही देण्यात आल्या.
स्पर्श क्लिनिकल लॅबोरेटरीच्या माध्यमातून रक्त तपासणीवर 50% सवलत देण्यात आली तसेच पुढील तीन महिन्यांपर्यंत उपचारांवरही 50% सवलत देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. जिलानी पटेल यांनी दिली.
या शिबिरात डॉ. नवीदखां साहब (लातूर), डॉ. महेबुब शेख, डॉ. जाकेर पटेल, डॉ. नौमान शेख, डॉ. हारुण शेख यांचा सक्रिय सहभाग होता.
नागरिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा उपक्रम गरजू रुग्णांसाठी दिलासा ठरत असून, डॉ. जिलानी पटेल यांचे समाजाप्रती असलेले योगदान सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.


0 Comments