लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी व आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक स्वरूपाची मदत करावी या मागणी करिता महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने लातूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने आंदोलन*..

 *लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी व आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक स्वरूपाची मदत करावी या मागणी करिता महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने लातूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने आंदोलन*.........




मनसे पक्षप्रमुख मा.राजसाहेब ठाकरे यांचे आदेशानुसार तसेच पक्षाचे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी सोमवारी ठीक सकाळी ११ वा. मा.जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांना खालीलपैकी मागण्याचे निवेदन देऊन निदर्शने करण्यात येणार आहेत.

१) शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या फेऱ्यात न अडकवता संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी करावी 

२) जिरायत शेती पिकासाठी हेक्टरी १ लाख रुपयाची मदत करण्यात यावी. 

३) बागायत पिकासाठी दीड लाख रुपयाची मदत करावी.

४) बहुवार्षिक पिके (फळबागासाठी) प्रति एकरी २ लाख रुपयाची मदत करावी.

५) मनुष्यहानीसाठी शासनातर्फे केली जाणारी मदत अत्यंत तोकडी असून त्यात वाढ करून १० लाख रुपयाची मदत द्यावी.

६) गाय,महेश,बैल,घोडा व मृत गुराढोरासाठी प्रती जनावर १ लाख रुपयाची मदत करावी.

७) जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रती एकरी १ लाख रुपयाची मदत करावी.

८) घराची पडझड झालेल्या नागरिकांना घरकुल योजनेतून तात्काळ पक्के घर बांधून देण्यात यावे व इतर नुकसानीपोटी आर्थिक स्वरूपाची तात्काळ मदत करावी.

या मागण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments