वाळूची अवैध चोरटी वाहतूक करणारा हायवा टिप्परसह 20 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त — स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*


*वाळूची अवैध चोरटी वाहतूक करणारा हायवा टिप्परसह 20 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त — स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*



 लातूर: जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री.अमोल तांबे तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली लातूर पोलीसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहिती वरून दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री गरुड चौक परिसरात सापळा लावून गौण खनिज (वाळू) ची विनापास परवाना अवैध वाहतूक करणारा टाटा कंपनीचा हायवा टिप्पर (क्रमांक MH 24 AU 3888) ताब्यात घेण्यात आला.

              सदर वाहनात सुमारे 04 ब्रास वाळू (किंमत ₹20,000/-) आढळली असून,सदर हायवा टिप्परची किंमत अंदाजे ₹20,00,000/- अशी आहे. या प्रमाणे, एकूण ₹20,20,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


1.प्रशांत मुरलीधर बंडेवाड (वय 34 वर्षे, रा. कोळवाडी, ता. अहमदपूर) – चालक


2.विजयकुमार पाटील (रा. परचंडा, ता. अहमदपूर) – वाहनमालक


वरील दोघांविरुद्ध शासन परवानगीशिवाय वाळूची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक प्रशांत बंडेवाड यास अटक करण्यात आली असून, गुन्ह्याचा पुढील तपास विवेकानंद चौक पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

                  सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली,

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस अंमलदार रामलिंग शिंदे,संजय कांबळे, सूर्यकांत कलमे,तुराब पठाण पाराजी पुठेवाड यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments