डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचा अपमान भिम आर्मी खपवून घेणार नाही - अक्षय धावारे
लातूर प्रतिनिधी:-
लातूर मध्ये अनिल मिश्रा व राकेश किशोर च्या फोटोला जोडे मारो करत फोटो चे दहन करून निषेध केला व्यक्त
लातूर - काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाचे सर न्यायाधीश भुषण गवई साहेब यांच्यावरती किशोर राकेश या मनुवाद्याने भर कोटीत सरन्यायाधीश यांच्या वरती बुट फेकला आहे हा न्याय व्यवस्था व भारतीय संविधानाचा अपमान आहे तसेच अनिल मिश्रा या या मनुवाद्याने भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले नाही असा एकेरी शब्दात जाणिवपूर्वक अपमानास्पद विधान केले आहे यामुळे समस्त आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत समाजात तिव्र रोष होताना दिसत आहे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क समोर भिम आर्मी च्या वतिने फोटोला जोडे मारो आंदोलन करत त्यांच्या फोटो चे दहन करत निषेध नोंदवला या देशात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान भिम आर्मी कधी ही खपवून घेणार नाही अनिल मिश्रा सारख्या जातीय सलोखा बिघडवण्याच्या प्रयत्न करणाऱ्याला वेळीच त्याची जागा दाखवून देऊ असा इशारा भिम आर्मी चे मराठवाडा निरीक्षक अक्षय धावारे यांनी दिला तर अनिल मिश्रा दिसेल तिथे ठोकणार अशा इशारा भिम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे यांनी दिला देशात महापुरुषांच्या विचाराला गालबोट लावण्याचा प्रकार घडवला जात आहे याला वेळीच आवर घातला पाहिजे असे मराठा लिबरेशन टायगर संघटनेचे भिम गडेराव यांनी भिम आर्मी च्या आंदोलनाला पाठिंबा देत मत व्यक्त केले आहे यावेळी भिम आर्मी चे मराठवाडा निरीक्षक अक्षय धावारे माजी मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे जिल्हा उपाध्यक्ष विशाल पोटभरे जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे जिल्हा सचिव बबलू शिंदे शहर अध्यक्ष संदिप कांबळे सोनु घोडके ,रोहन धावारे ,अमोल गेजगे ,आकाश ढगे, अजय कांबळे ,समाधान कांबळे सुनिल जोगदंड सोमनाथ भुनाप ,मारूती घनगावकर ,लखन यादव दादापीर शिकलकर मयुर चक्रे सोहेल अत्तार शामसिंग जुन्नी नाना रमेश कांबळे अक्षय सावंत किशन गायकवाड सुशिल कांबळे रूषिकेश भाले अदित्य कांबळे पंकज कांबळे हरिश सोनवणे यश सोनवणे मानवाधिकार संरक्षण समितीचे नितीन एकुर्गेकर मराठा लिबरेशन टायगर संघटनेचे माऊली देशमुख व्यंकट साखरे समीर शेख अजय भांडेकर लक्ष्मण काळे विशाल काळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते या निषेध आंदोलनात सहभागी होते

0 Comments