उर्दू घरात उर्दू दिवस थाटात संपन्न .
बे - नज़ीर तौसीफी कमेटी व नूर ट्रस्टच्या उपक्रम
प्रत्येक भाषिकांनी आपल्या भाषेचे जतन केले पाहिजे
मौलाना कासमी यांचे मत
उर्दू घरात सर्व प्रकाच्या पुस्तके लवकरच उपलब्धद होतील- सदाशिव पडदुणे
- - - - - - - - - - - - - - - - - - - -
सोलापूर - भाषा प्रत्येक धर्माची संस्कृती दर्शविते म्हणून प्रत्येक भाषिकानी आपली भाषा जतन केले पाहिजे ऊर्दू भाषा ही गंगा जमुनी संस्कृति आहे . उर्दू भाषा हे फक्त मुस्लीमांची भाषा नाही हे गैर समज दूर करून घ्या .आणि
आपण आपली भाषा जतन करा कारण ही भाषा तुमच्या आईची भाषा आहे ही मिटता कामा नये असे मत जमियत उलमाए हिंदचे सचिव मौलाना इब्राहीम कासमी यांनी जागतिक किर्तीचे कवी डॉ अल्लामा इक्बाल यांच्या जन्म दिना निमित्त म्हणजे उर्दू दिवसा निमित्त " बे -नजीर तौसीफी कमेटी व नूर ट्रस्ट "च्या वतीने आयोजि कार्यक्रमात अध्यक्षस्थानी आपले मत व्यक्त केले .
या वेळी "तहरीके मुतालेआ - वाचन चळवळ पत्रिके " चा प्रकाशन मौलाना इब्राहीम कासमी , महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीचे कार्याध्यक्ष डॉ हसीन अख्तर ( बीड ) , प्रांत अधिकारी श्री सदाशिव पडदुणे , प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख , नूर ट्रस्टचे नज़ीर मुन्शी , तौसिफी कमेटीचे अध्यक्ष अय्यूब अहमद नल्लामंदू , सचिव डॉ म . शफी चोबदार , डॉ इस्माईल शेख , डॉ फेरोज सय्यद , शिक्षण तज्ञ तौसीफ परवेज (पुणे) ,, रोटरी क्लबचे शब्बीर शेख , सौ सरिता. पडदुणे यांच्या प्रमुख उपस्थितित करण्यात आले
यावेळी महाराष्ट् राज्य उर्दू साहित्य अकादमीचे हसीन अख्तर व नजीर मुन्शी यांना सन्मान -पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले .
यावेळी शिक्षणाधिकारी कादर शेख म्हणाले - आज उच्चा शिक्षण शिवाय सु - संस्कृत विद्यार्थी घडविण्याची गरज आहे आणि हे काम पुस्तकच्या वाचनातून होईल
प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीचे कार्याध्यक्ष हसीन अख्तर नीं अचार संहिता लागू असल्याने मी काही घोषणा करू शकत नाही परंतू उर्दू दिनाच्या शुभेच्छा दिल्या .
या नंतर प्रांतअधिकारी सदाशिव पडदुणे म्हणाले - मोबाईल पासून मुलांना दूर ठेवण्यासाठी पुस्तक वाचन पर्याय आहे त्याचा फायदा जरूर घ्यावे . ते पुढे म्हणाले उर्दू घरात ज्ञान विज्ञानचे ही पुस्तके उपलब्ध करून देण्यात येईल . याचा सर्व उर्दू प्रेमिनी फायदा घेतील
डॉ इसमाईल शेख ,तौसीफ परवेज सह पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत दोन्ही संस्थाचे शैक्षणिक कार्याचे कौतुक करत म्हणाले - कि उर्दू दिना निमित्त उर्दू भाषेचा प्रसार व प्रसार ,शिक्षणाची गुणवता आणि सामाजिक ऐक्य वृद्धिगंत करण्यासाठी " बे - नजीर पुरस्कार सोहळा " हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरला आहे असे मत व्यक्त करत आभार मानले .
0 यांचा झाला सन्मान 0
- - - - - - - - - - - - - -
या कार्यक्रमात शिक्षण, समाजसेवा, प्रशासन, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवर व्यक्तींना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
0 "मुहिब्बे-उर्दू पुरस्कार " सदाशिव पडदुणे, (उपविभागीय अधिकारी )
0 जीवन गौरव पुरस्कार - 0
अब्दुल मलिक निजामी [ नांदेड ], एम. शफी कॅप्टन आणि मुश्ताक अहमद लाला शेख ( सोलापूर )
0 शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य पुरस्कार डॉ. मन्सूर ए. काझी पुणे
0 आदर्श अधिकारी पुरस्कार 0 निलोफर सय्यद (पर्यवेक्षक, शिक्षण मंडळ सोलापूर) दौलत बेगम शेख ( विस्तार अधिकारी. जिपसो )
0 आदर्श समाज सेवक पुरस्कार 0 खलीक मन्सूर, अध्यक्ष – यशवंत कामगार सेना
0 सर्वोत्कृष्ट डिजिटल प्लॅटफॉर्म पुरस्कार “बदलाव ज़रुरी है” या सामाजिक उपक्रमशील संस्थेस
- - - - -
0 आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार 0
मुबीन मडकी (नवजीवन इंग्लिश स्कूल) मज़हर इस्माईल शाहपुरे (सिटिझन उर्दू शाळा सोलापूर)
- - - - - - - - -
0 आदर्श शिक्षक पुरस्कार 0
प्रा डॉ. ज़ैनब नायब (महिला महाविद्यालय), प्रा.डॉ. आस्मां खान ( सोशल महाविद्यालय ) साबीहा मुजावर (नॅशनल उर्दू शाळा ), मेराज मजहर अल्लोळी .(शमा उर्दू प्राथमिक शाळा), तबस्सुम परवीन शेख ( मनपा कॅम्प उर्दू शाळा ), आफरीन शेख (यू.ई.एस. उर्दू प्राथमिक शाळा), इलियास अहमद शेख (बीबी हयात उर्दू प्राथमिक शाळा), ख्वाजा युसुफ बेपारी (जि.प. उर्दू शाळा, दूधणी), अलमास इलियास शेख (एस.एस.ए. उर्दू हायस्कूल), बख्तियारी कौसर बानो अहमदुला ( मनपा मुले ), परवीन बेगम शेख (आयडियल उर्दू शाळा) आस्मां बांगी (ए.डी. शेख उर्दू शाळा)
- - - - - - - - - - -
0 " रीडर लीडर पुरस्कार" 0
आयडियल उर्दू प्राथमिक शाळा, जि प उर्दू प्राथमिक शाळा, बुरहानपूर व बोरमणी यांना देण्यात आले .
सादिक बागबान यांनी कुराण पठण केले नूर ट्रस्ट चे नजीर मुन्शी नी स्कॉकरशीप विषयी माहिती दिली तर तौसिफी कमेटीचे अध्यक्ष अय्यूब नल्लामंदू यांनी सर्वांचे स्वागत करत आपल्या प्रास्ताविकेत महाराष्ट्र शासनाच्या उर्दू अकादमी मार्फत बंद पडलेले
उर्दू नाटय स्पर्धा पुन्हा सुरु करण्याची मागणी केली
या भव्य कार्यक्रमाचे सुत्रसंचलन फहीम बाटगर , सुहेल नाईक , नवाज , इमरान जमादार , यांनी केले तर आभार अख्तर शेख यांनी मानले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सोहेल नाईक , अमीर पठाण , अख्तर शेख , कलीम बाटघर अली नल्लामंदू , इमरान जमादार , शोएब नाईक , माजीद वळसंगकर , माजीद बडेघर , अश्रफ पटेल , अबरार नल्लामंदू ', आरीफ कर्नूल , अल्लाबक्ष चौधरी , आसीया परवीन शेख , सरय्यदा जवेरीया इनामदार , तरन्नुम जहां शेख , शाहीन सुलताना शेख , आएशा खातून शेख यांनी खूप परिश्रम घेतले .
या वेळी बीडचे डॉ सिराज आरजु , इकबाल अन्सारी , रफीक खान , 'मुनाफ शेख ,प्राचार्य मन्नान शेख , रोटरी क्लबचे इकबाल बागबान , मजहर अल्लोळी , शमाचे अबुबकर नल्लामंदू , हसीब नदाफ , अखलाक शेख , याकूब मंगलगीरी , मुजम्मील बागबान , इकबाल थोटेकर ,उपस्थित होते .




0 Comments