औसा येथील आरोग्य मल्टिस्पेशॅलिटी मोफत नेत्र तपासणी शिबिर.
बी जी शेख.
औसा.शहरात ए.एस.आय हॉस्पिटल व आरोग्य मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटल
यांच्या संयुक्त विद्यमाने
मोफत नेत्र रोग तपासणी शिबीर आयोजित केले आहे.सर्व सामान्य व गरजु नागरिकांचे मोफत डोळे तपासून अल्प दरात चष्मा व मोतीबिंदू शिबीर आयोजित केले आहे.यात विशेषतः डोके दुखणे,डोळ्यातून पाणी येणे,डोळे लाल होणे, डोळ्याची आग होणे, डोळ्याची खाज येणे किंवा लांब व जवळचे कमी दिसणे,डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या आजारावर मोफत तपासणी
मोतीबिंदू तपासून अल्प दरात ऑपरेशन करुन लेन्स बसवून उपचार केला जाईल.
तिरकस नजर असणे किंवा तिरकस दिसणे यावर तपासणी व अल्पदरात इलाज.कॉम्प्यूटर किंवा मोबाईल वापरामुळे होणाऱ्या परिणामावर इलाज करुन योग्य तो चष्मा देण्यात येईल.लहान मुलांना पण डोळ्याची काही त्रास असेल तर ते पण बघितले जाणार आहे.
आपल्याकडील जुना चष्मा असेल तर तो शिबीराला येताना घेऊन यावे.शिबीरात विशेष म्हणजे
मोफत डोळ्याची तपासणी.
डोळ्याचे ऑपरेशन व चष्मे अल्पदरात देण्यात येणार आहेत.अपंगांना मोफत असेल.हे शिबिर १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आरोग्य मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटल औसा येथे होईल.
अधिकाधिक जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन हास्पिटल चे संचालक डॉ रफिक शेख व नेत्र तज्ञ सय्यद मोहम्मद यांनी केले आहे.

0 Comments