बाबरी मशीद विध्वंसाच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाचे निवेदन.
6 डिसेंबर हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळत मुस्लिम समाजाने बाबरी मशीद विध्वंसाच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. निवेदनात म्हटले आहे की, भारताचे प्रजासत्ताक संविधान संघटित, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांवर उभे आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला आपापल्या धर्माचे पालन करण्याचा मूलभूत अधिकार आहे. मात्र 6 डिसेंबर 1992 रोजी काही समाजकंटकांनी देशाची एकता आणि सांप्रदायिक सौहार्द धोक्यात आणत ऐतिहासिक बाबरी मशीद पाडण्याचे कृत्य केले. ही घटना देशाच्या इतिहासातील काळा अध्याय असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
यानंतर देशभरात उसळलेल्या दंगलींमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले. विशेषत: मुस्लिम समाजावर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये अनेक निरपराधांचे बळी गेले. त्यामुळे दंगलीतील सर्व पीडितांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच, दंगल भडकवणाऱ्या सर्व समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि अशाप्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, अशी मागणीही एम आय एम प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा तहसिलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे करण्यात आले.
मुस्लिम समाजातर्फे या घटनेचा तीव्र जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मुजफ्फर अली इनामदार, शेख नय्युम,अझहर कुरेशी, जहांगीर पठाण,मौला शेख, एजाज शेख,हारुणखां पठाण,अनवरखां, सय्यद शाहाबोद्दीन, फेरोज पटेल,तैय्यब सय्यद आदि उपस्थित थे!

0 Comments