स्वतंत्रता संग्राम मध्ये अतुलनीय योगदान ➡️ शेखुल हिंद मौलाना महमूद उल हसन रहमतूल्लाह अलयही ◆■■■◆◆◆◆◆◆◆◆ शेख-उल-हिंद म्हणून प्रसिद्ध असलेले मौलाना महमूद उल हसन रहमतूल्लाह अलयही

 स्वतंत्रता संग्राम मध्ये अतुलनीय योगदान ➡️

शेखुल हिंद मौलाना महमूद उल हसन रहमतूल्लाह अलयही ◆■■■◆◆◆◆◆◆◆◆




शेख-उल-हिंद म्हणून प्रसिद्ध असलेले मौलाना महमूद उल हसन  रहमतूल्लाह अलयही

हे भारतीय राष्ट्रीय चळवळीत पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात उलेमांनी बजावलेल्या भूमिकेइतकीच महत्त्वाची भूमिका बजावणारे पहिले महापुरुष मानले जातात. त्यांचा जन्म १८५१ मध्ये उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील बरेली येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांचे वडील मौलाना झुल्फिकार अली (र.अ) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मूळ गावात पूर्ण केले आणि पुढील शिक्षणासाठी उत्तर प्रदेशातील देवबंद येथील दारुल-उलूममध्ये प्रवेश घेतला.


ते दारूल उलूम देवबंद संस्थेचे पहिले विद्यार्थी होते आणि त्यांच्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर ते १८८८ मध्ये मोहतमीम ( अध्यक्ष)झाले. मौलाना महमूद उल हसन (र.अ.)

यांच्या नेतृत्वाखाली मातृभूमीला ब्रिटीश राजवटीपासून मुक्त करण्याच्या अंतर्निहित उद्देशाने स्थापन झालेल्या दारुल-उलूमने स्वातंत्र्य सैनिक निर्माण करण्यासाठी सखोल प्रयत्न सुरू केले. १९११ पासून झालेल्या आंतरराष्ट्रीय राजकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर, मौलाना हसन यांनी वायव्य सरहद्दीतील लोकांना ब्रिटीश सैन्यावर हल्ला करायला लावण्याची योजना आखली ज्यामुळे देशातील लोकांना आणि ब्रिटीश भारतीय सैन्यातील भारतीय सैनिकांना ब्रिटीश राजवटीविरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त केले. देवबंदला त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू मानून त्यांनी दिल्ली, दीनापूर, अमरोहा, कराची, चेडा, चकवाल आणि काबूल येथे शाखा स्थापन केल्या. १९१५ मध्ये त्यांनी त्यांचे शिष्य मौलाना ओबेदुल्लाह सिंधी (र.अ.)

 यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ अफगाणिस्तानात पाठवले आणि १९१६ मध्ये ते स्वतः मक्काला निघाले. त्यांनी तुर्कीचे गव्हर्नर गालिब पाशा यांची भेट घेतली आणि त्यांना त्यांची योजना समजावून सांगितली आणि त्यांना अनुकूल प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी

ब्रिटीश सैन्यातील भारतीय सैनिकांना बंड करण्यास प्रवृत्त करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांनी त्याचे शिष्य ओबेदुल्लाह सिंधी (र.अ.) यांच्यामार्फत रेशमी कापडावर लिहिलेले एक पत्र भारतीयांना बंड करण्यास प्रोत्साहित करणारे पत्र भारतात पाठवले. हे पत्र ब्रिटीश गुप्तहेरांच्या हाती लागले. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात हा भाग 'सिल्क लेटर कॉन्स्पिरेसी' म्हणून ओळखला जातो. रेशीम पत्राद्वारे मौलाना महमूद हसन (र.अ.)यांच्या योजनेची माहिती मिळाल्यावर, ब्रिटीश सरकारने त्यांना माल्टा तुरुंगात कैद केले आणि त्यांचा अतोनात छळ केला. अखेर त्यांची १९२० मध्ये सुटका केली. घरी आल्यानंतर त्यांनी खिलाफत-असहकार चळवळींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्या काळात त्यांनी अलीगडमध्ये जामिया मिलिया इस्लामिया नावाच्या राष्ट्रीय विद्यापीठाची पायाभरणी केली. जमियत उलेमा ए हिंदच्या बैठकीत त्यांनी उलेमांना साम्राज्यवादी शक्तींविरुद्ध बंड करण्याचे आवाहन केले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि धार्मिक कार्यात सतत सहभागी झाल्यामुळे त्यांची प्रकृती खूपच खालावली. अखेर ३० नोव्हेंबर १९२० रोजी मौलाना महमूद हसन (र.अ.)यांचे निधन झाले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

संदर्भ -THE IMMORTALS 2

- SYED NASEER AHAMED

( 94402 41727)

संकलन तथा अनुवादक लेखक - 

अताउल्लाखा रफिक खा पठाण सर

सेवानिवृत्त शिक्षक

टूनकी तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र 

9423338726

Post a Comment

0 Comments