स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुकीत नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध
लातूर, दि. २३: राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२५ रोजी लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्याच दिवशीपासून या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. ही निवडणूक संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी या निवडणूक काळात नमुना मतपत्रिका छपाईबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने मुद्रणालयाचे मालकाने व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापतांना इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे व आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे या बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये जिल्हादंडाधिकारी यांनी नमुना मतपत्रिका छपाईस निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
*****

0 Comments