स्वातंत्र्यदिन सोहळा मनपा मुलांची उर्दू शाळा क्र. ३ उत्साहात साजरा

 स्वातंत्र्यदिन सोहळा मनपा मुलांची उर्दू शाळा क्र. ३ उत्साहात साजरा





सोलापूर, मंगळवार बाजार, जोडबावी पेठ येथील मनपा मुलांची उर्दू शाळा क्र. ३ मध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जबीर अल्लोळी यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून सोहेल मोतीवाला, शुएब चौधरी, फुरकान रामपूर मोलाना, हाफिजभाई मुतव्वली, माजिद बगवान, इम्तियाज आंदेवाडी, मुजम्मील शाहपूरे, इम्रान शेख आणि फारुक तांबोळी हे उपस्थित होते.

कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरण, देशभक्तीपर गीत, तसेच देशभक्तीच्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी देशप्रेम व्यक्त केले.

 याप्रसंगी व्यवसायिक मोतीवाला यांच्यावतीने शाळेसाठी प्युरिफाईड वॉटर मशीन, २० फॅन, गालिचे, ३ संगणक, २ वर्गांचे रंगकाम देण्यात आले. तसेच शोएब चौधरी यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी ६० डेस्क प्रदान करण्यात आल्या.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक नाझिया शेख, महबूब्बी  शेख, सनोबर शेख, शबनम नदाफ आणि अलमास पीरजादे यांचे तसेच बालवाडी शिक्षिका बीबी हाजरा आणि सुनीता पवार यांचे परिश्रम घेतले.

शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले. कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापिका जबिन मुल्ला यांनी केली.

Post a Comment

0 Comments