प्रताप गोरख वाघमारे उपजिल्हाधिकारी,वर्धा आणि श्री पवन नागनाथ मंगरूळे,उपजिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल समस्त बुधोडा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार सोहळा

 बुधोडा येथे जाहीर सत्कार सोहळा उत्साहात संपन्न





      आज दिनांक 10/01/ 2026 रोजी बुधोडा येथे श्री प्रताप गोरख वाघमारे उपजिल्हाधिकारी,वर्धा आणि श्री पवन नागनाथ मंगरूळे,उपजिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल समस्त बुधोडा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.

        अति दुर्गम भागातील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक व प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बुधडा गावचे सुपुत्र व जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी असल्या कारणाने त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच श्री तुकाराम मिटापल्ले होते. प्रमुख पाहुणे म्हणून काकासाहेब कांबळे अंगद पाटील, निवृत्ती अलगुले,गुलाब साहेब, श्री गोविंदजी माने साहेब वरिष्ठ पी.ए,श्री सुमंत कवळीकर उद्योजक,सुखदेव मस्के,महादेव बिराजदार, मुअ, अमरदीप कांबळे अध्यक्ष,अरुण कांबळे, सदस्य ग्रा.प, अविनाश शेडुळकर तलाठी, रविकांत शिरसाट सर इत्यादी उपस्थित होते.                                              सत्कारमूर्तीच्या कार्याचा आढावा श्री सुखदेव मस्के चिंचोलीकर  यांनी आपल्या भाषणातून मांडला. यावेळी मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या व समस्त शिक्षणप्रेमी बुधोडा ग्रामस्थांच्या वतीने दोन्ही सत्कारमूर्ती व त्यांच्या आई-वडिलांचा यथोचित सत्कार  करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना श्री प्रताप गोरख वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले व भविष्यातही समाजासाठी प्रामाणिक कार्य करत सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा व हवी ती मदत करत कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला. आणि विद्यार्थ्यांना आपल्या यशाचे रहस्य केवळ कष्ट हेच असते असे आपल्या प्रेरणादायी मनोगतातून व्यक्त केले. तसेच श्री पवन मंगरुळे यांनीही आपले अनमोल मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास शंकर देवकते अविनाश मगर गहिनीनाथ चिलमे श्रीकांत गायकवाड लिंबराज भुत्ते केरबा चिलमे गोपीनाथ मगर मीराताई मस्के तुकाराम देवकते सोमनाथ उमरदंड विठ्ठल गायकवाड सूर्यकांत सातपुते  विजयकुमार भुते परिवार  नागनाथ देवकते नारायण सुरवसे अविनाश मगर शिक्षणप्रेमी नागरिक, शिक्षक,पदाधिकारी, कार्यकर्ते,महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

     या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्रीमती भारत कांबळे मॅडम यांनी करून आभार मानले वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सुंदर सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments