*चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळेस*
*सावित्री फातीमा उपक्रमशिल शाळा पुरस्कार*
सोलापूर- फिरदोस महिला शिक्षण व समाज सेवा संस्था संचलित चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळेस शिक्षक भारती संघटनेच्यावतीने सावित्री फातीमा उपक्रमशिल शाळा म्हणून संघटनेच्या राज्यअध्यक्ष अशोक बेलसुरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार कपिल पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी कादर शेख उपस्थित होते. यावेळी शिक्षक भारती संघटने जिल्हा अध्यक्ष सुजितकुमार कारमोरे, उपाध्यक्ष रियाजअहमद अत्तार आदी उपस्थित होते.
हे पुरस्कार शाळेचे संस्थापक बशीर बागवान व शिक्षकांनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वीकारला. शाळेस पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा डॉ. जे. बी . बागबान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यांनी अभिनंदन केले.

0 Comments