नैतिकतेचा अथांग सागर,
सत्कर्मांचा महासागर…
पावन झाली ईराणची भूमी,
जिथे जन्मले आयातुल्लाह अली खोमेनी।
भीतीपोटी कधी न झुकले,
सत्यासाठी उभे राहिले;
शहादत स्वीकारण्याला त्यांनी
ईश्वराचे वरदान मानले।
मातृभूमीच्या रक्षणासाठी
प्राणही पणाला लावले,
ईश्वरनामाच्या स्मरणात
क्षणोक्षणी जीवन वाहिले।
लहानांपासून थोरांपर्यंत
सर्वांचे आवडते झाले,
मार्गदर्शनात आपुलकीने
जीवन त्यांनी घडविले।
राष्ट्र प्रथम त्यांनी मानीले
जडणघडणीसाठी आयुष्य वेचले
जगात त्यांनी मान उंचवत...
ईराणला सक्षम, समृद्ध बनविले....
असा असावा नेता खरा,
जो शेवटपर्यंत रणांगणात राही,
सत्तेपेक्षा मूल्यांना जपणारा,
आदर्शांचा दीप सतत पेटवी।
- --------- भारताचे मित्रत्व शेवटपर्यंत निभावणारे आयातुल्लाह अली खौमेनी यांना भावपूर्ण आदरांजली.........
- बशीर शेख "कलमवाला"

0 Comments