विद्यार्थ्यांनी मराठी भाषा अवगत करावे : करजगीकर चाँद तारा उर्दू शाळेत मराठी दिवस साजरा

 विद्यार्थ्यांनी मराठी भाषा  अवगत करावे : करजगीकर


चाँद तारा उर्दू शाळेत मराठी दिवस साजरा







सोलापूर - फिरदोस महिला शिक्षण व समाज सेवा संस्था संचलित चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळेत मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक पद्मभूषण कवी विष्णू वामन शिरवाळकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून शाळेत मराठी दिवस साजरा करण्यात आला.


यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सल्लागार हाजी बशीर बागबान हे अध्यक्षस्थानी होत तर प्रमुख पाहुणे मराठीचे सेवानिवृत्त शिक्षक बी. एच. करजगीकर, अय्यूब अहमद नल्लामंदू, संस्थेचे अध्यक्षा डॉ. जन्नत बागबान, इक्बाल बागबान हे उपस्थित होते.


यावेळी शाळेतील इयत्ता तिसरी व चौथी शिकणाऱ्या सादिया शेख, सनाउल्ला, अब्दुल करीम, आदीबा बागबान उजमा गबोरे, आलिया नदाफ, शेख सिमरन ,बागवान सानिया ह्यानी मराठीत कविता, अंताक्षरी व मराठी दिनाचे महत्व विषद करून उपस्थितांची दाद मिळवली.


प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापिका गजाला सौदागर यांनी केले. त्यानंतर मराठी दिनाची माहिती शिक्षिका जेबा पटेल यांनी सांगितले. त्यानंतर हाजी बशीर भाई बागबान, अश्रफ पटेल यांनी प्रमुख पाहुणे करजगीकर व नल्लामंदू यांना "स्पंदन जीवन गौरव पुरस्कार" मिळाल्याबदल त्यांचा तसेच प्रमुख पाहुणे इक्बाल बागवान यांचा शाल, बुके देऊन सत्कार केले.


यावेळी अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य परिषदेचे सचिव अय्यूब अहमद नल्लामंदू यांनी मराठी दिनाचे महत्व सांगत  "अम्मी" ही मराठी कविता ऐकवत रोज मराठी वृतपत्र  किंवा कमीत कमीत एक मराठी पुस्तकाचा एक प्यारा वाचन करण्याचा  सल्ला दिला.


त्यानंतर मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक बी. एच. करजगीकर यांनी म्हणाले, आपण उर्दू शाळेत शिकत असले तरी राज्यभाषा मराठीवर प्रेम करत त्याला अवगत करा, त्याला आत्मसात करायल शिका, मराठीच्या तासात अपसात मराठीमध्ये बोला, कारण या वयात आपण मराठीचे ज्ञान घेतले तर पुढे एक उत्तम कवी, साहित्यिक होऊ शकते.


कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन नेहा परवीन बागवान यांनी तर आभार आफरीन मुजावर यांनी  मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी खुप परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments