आली दिवाळी. घरोघरी

 आली दिवाळी. घरोघरी ती म्हणाली. राज्य सरकारने आपली कर्तव्य पार पाडले.दीपावलीच्या सणाला कालपासून. म्हणजे रमा एकादशी पासून दीपावलीच्या सणाला सर्वत्र प्रारंभ झालेला आहे. मराठवाडा विभागासह जवळपास अर्ध्या महाराष्ट्र वर दुष्काळाचे संकट आले आहे. राज्य सरकार दुष्काळ निवारणासाठी सर्वतोपरी नियोजनबद्ध प्रयत्न करत आहे.. शासनमान्य दुकानातून नियमितपणे अन्नधान्याची वाटप करण्यात येत असते. त्यामध्ये प्रामुख्याने गहू तांदूळ या दोन वस्तूचे वाटप करण्यात येत असते. मात्र पुरवठा विभागाकडून या दिवाळीच्या तोंडावर चक्क शंकरी ज्वारी उर्फ हायब्रीड चे वाटप करण्यात येत आहे. शासनाच्या पुरवठा विभागाअंतर्गत कोणत्या अधिकाऱ्याच्या सुपीक डोक्यातून एक कल्पना आली आणि त्याचे अंमलबजावणी होत आहे. यापूर्वीच्या काळात पुरवठा विभागाकडून आनंदाचा शिरा वर्षातील प्रमुख सणासाठी राज्य सरकारने वितरित केला होता. मोठा विभागाकडून सरकारच्या अनेक चांगल्या योजनांची अंमलबजावणी यापूर्वी झाली होती आता हे करण्यात येत आहे मात्र जाहीर येथील शुक्राचार्य कोण असावा की ज्याच्या सुपीक डोक्यातून आणि दिवाळीच्या तोंडावर संकरीत ज्वारी हायब्रीड चे वितरण करण्यात येत असल्याचे विश्वास नाही रित् समजते. विशेष म्हणजे दिवाळीच्या तोंडावर संकरी ज्वारीची मेजवानी देण्याचे धाडस आणि कल्पना अशा कोणत्या अधिकाऱ्याच्या डोक्यातून निघाली तयार झाली. आणि ह्या दिवाळीच्या तोंडावर दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी रेशन धारकांना संकरित ज्वारी चे वितरण होत असल्याचे ऐकण्यात येत आहे . वर आधारित केल्याप्रमाणे पुरवठा विभागाकडून या अगोदर आणि वर्तमान सरकारच्याचांगल्या लोकल जानकारी योजनेची अंमलबजावणी झाली होती आणि करण्यात येत आहे. शंकरी ज्वारी उर्फ हायब्रीड याचे वितरण करण्याबाबत दुष्काळ व शेतकऱ्यांची नकार नाही मात्र दिवाळीच्या सणामध्ये हे कसे काय वाटप करण्यात येत आहे. असा सवाल दुष्काळग्रस्त शेतकऱ्याकडून उपस्थित करण्यात येत असल्याचे करण्यात येत आहे. मागील काळात महायुती सरकारने दिवाळी दसरा गुढीपाडवा शिवजयंती या सणाच्या निमित्ताने राज्यातील जनतेला अल्प दरात आनंदाचा शिधा वितरण करण्यात येत असे. आर्थिक दृष्ट्या सरकारला परवडणारे नसल्यामुळे सदर आनंदाचा शिधा बंद झाला. असो आणि या दिवाळीमध्ये आनंदाचा शिरा केव्हा जे कोणी राज्यातील उद्योगपती नेते मंडळी आर्थिक दृष्ट्या संपन्न गटातील जी मंडळी आहेत त्यांच्याकडून दुष्काळग्रस्त जनतेला दिवाळी सणासाठी आवश्यक वस्तूंचा मोफत पुरवठा करणे त्या मान्यवरांचे कर्तव्य होते आहे. मात्र सामाजिक बांधिलकी स्वीकारून अशी जबाबदारी पार पडणारे अत्यंत तुरळक असल्याचे दिसून येत आहे. या अगोदरही शासनमान्य रेशन दुकानातून कार्डधारकांना संकरित ज्वारी उर्फ हायब्रीडचे वितरण झाले होते त्याबाबत हे कार्डधारकांनी काही प्रतिक्रिया व्यक्त झाली नव्हती. विशेष म्हणजे या दिवाळीच्या तोंडावर काल धारकांना विशेष करून मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संकरित ज्वारी उर्फ हायब्रीड या ज्वारीचे वितरण होत आहे. दिवाळीसाठी राज्य सरकारने आनंदाचा शिधा बंद झाला तरीही सरकारला राज्यातील आर्थिक संपन्न गटातील मान्यवरा कडून अशी सुविधा  त्याअशतही शेतकऱ्यांसाठी उपयोजक करून घेता येईल. अद्यापही मुलगी गेली नाही. विशेष म्हणजे राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पिकनिक सानिपोटेटी आर्थिक अनुदान वितरण होत असल्याचे समजते. बऱ्याचश्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सदर अनुदान जमा होत असल्याचे विश्वसनीरित्या समजते मात्र अद्यापही अनेक शेतकरी यापासून वंचित असल्याचे ऐकण्यात येत आहे. मुख्यमंत्री महोदय ना. देवा भाऊ फडणवीस यांनी अभिवचन दिल्याप्रमाणे किमान या दिवाळीच्या दिवसात त्यांचे सदर अनुदान लवकरात लवकर जमा 



 व्हावे अशी अपेक्षा दुष्काळग्रस्त शेतकऱ्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे समाज माध्यमावर काही खाजगी इलेक्ट्रॉनिक वाहिन्यावर राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडूनही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान वाढीव दराने मिळणार असल्याचे वृत्त झळकत आहे. प्रधानमंत्री मोदी जी यांनी पुणे येथील मेट्रो स्थानिक रेल्वेच्या उद्घाटन प्रसंगी दूरदर्शन वाहिनीवरून उद्घाटन करताना केंद्र सरकार राज्य सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे भक्कम आर्थिक आधार घेण्याचे स्वतो वाच प्रधानमंत्री ना. नरेंद्रजी मोदी यांनी केली आहे. आणि म्हणून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सध्या तरी मानसिक दिलासा मिळत आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिवाळी सणासाठी आगरीम रक्कम देण्यात येत असल्याचे आणि उर्वरित रक्कम दिवाळीनंतर आता करण्यात येईल असेही मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे. सर्जिकल राज्य सरकारच्या वतीने तीव्र दुष्काळावर मात करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येत आहेत.. विशेष म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा कोटी प्रतिहेक्टरी सुमारे 40 हजार रुपये आणि दुष्काळग्रस्त आर्थिक मदत म्हणून प्रती हेक्टरी हमारे पंधरा हजार रुपये अशी एकूण रक्कम सुमारे 60000 पर्यंत मिळेल असाही अंदाज सरकार पक्षातील लोकप्रतिनिधीकडून बोलले जात आहे. अशी असेल तर या निर्णयाचे विश्वास शेतकऱ्याकडून स्वागतास होईल. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून पाच हजार रुपये ही मोलाची मदत आहे हे नाकारून चालणार नाही. मंत्री महोदयांनी स्पष्ट केल्याप्रमाणे लोक मोठ्या मोठ्या आलिशा राजवाड्यासारख्या घरात राहतात आणि भारी भारी चार चाकी गाडी फिरतात त्यांना 5000 रुपयाचे मौल कळणार नाही हे अगदी बरोबर आहे ज्यांना शेतकऱ्यांना काही दिलासा आर्थिक दिलासा कधी देता आला नाही आणि वर्तमान सरकार जे कर्तव्य पार पाडत आहे त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण फक्त करण्यात येत आहे. विशेष करून राज्यातील सर्वाधिक तीव्र दुष्काळ परिस्थिती मराठवाडा विभागात आहे. सर्वप्रथम राज्य सरकारने मराठवाडा भागातील शेतशवारात बांधावर जाऊन मुख्यमंत्री महोदयासह त्यांचे सहकारी यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे दुःख वेदना जाणून घेतल्या होत्या. आणि प्रथम तीव्र दुष्काळग्रस्त मराठा शेतकऱ्यासाठी आर्थिक अनुदान मंजूर करण्यात आले होते. नंतर राज्यातील इतर विभागातील शेतकरी हे उठून बसले आणि आपणही आता दुष्काळग्रस्त खायला हवे. या मानसिकतेतून त्यांच्याही सरकारकडून आर्थिकअपेक्षा वाढल्या. त्या नाही सदर दिलासा देण्यात येत आहे. पण काही म्हणू दुष्काळात थरपलेल्या शेतकरी कुटुंबीयांना दिवाळीच्या अंधारात पणतीचा प्रकाश देण्याचे पवित्र आणि आवश्यक कर्तव्य राज्य सरकारने पार पाडण्यात येत आहे हे आम्हाला या ठिकाणी विशेष करून नमूद करत आहे .आणि मग त्यातूनच त्यांनाही सदर मदत देण्यात येत आहे. असे असेल तर हे राज्य सरकारने राज्यातील अति तीव्र मराठवाडा विभागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडे आगामी काळात हे विशेष लक्ष द्यावे लागेल हे या ठिकाणी स्पष्ट करणे प्रामाणिक पत्रकारितेचे कर्तव्य ठरते. आणि म्हणून अद्यापही वेळ गेलेली नाही राज्यातील सर्व स्तरातील आर्थिक दृष्ट्या संपन्न गटातील सर्व मान्यवरांनी अति तीव्र दुष्काळ ग्रस्त मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांसाठी जी जी मदत करणे शक्य आहे ते करावे अशा मला त्या निमित्ताने नम्रपणे सूचित करावेसे वाटते. तूर्तास एवढे पुरे. 

-विलास कुलकर्णी 

ज्येष्ठ पत्रकार 

95 52 19 72 68.

Post a Comment

0 Comments