*प्रतिनिधी समीर तांबोळी*
*विटा गुहागर राज्यमार्ग वर वाढत्या अपघाताची संख्या कमी करणेसाठी रबलिंग पट्टे व इतर उपाययोजना करणेसाठी.विविध सामाजिक कार्यकर्ते चे विटा ताखानापूर ला रस्ता रोखो आंदोलन*
गेले कित्येक दिवस विटा शहर व परिसरात अपघातांची मालिका सुरू आहे. याबाबत उपाययोजना राबविण्यासाठी वेळोवेळी तोंडी व लेखी विनंती केली होती. परंतु प्रशासनाने त्याची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना अपघाताने आपले प्राण गमवावे लागले आहेत. व अनेक लोक जायबंदी झाले आहेत. यास सर्वस्वी जबाबदार प्रशासनच आहे.या गोष्टी कडे लक्ष वेदण्या साठी डायमंड कल्चरल ग्रुप चे सर्वसर्वी शंकर नाना मोहिते याच्या नेतृत्व खाली रास्ता रोको करण्यात आला. येणाऱ्या पंधरा दिवसांत जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर प्रशासनाचा निषेध म्हणून पुन्हा तिरडी मोर्चाची तयारी करून प्रशासनाची अंत्ययात्रा काढू असे आंदोलन कर्त्यांनी ठणकावून सांगितलं रस्ता रोखो तील प्रमुख मागणया
रबलिंग पट्टे मारणे. (शाळा, कॉलेज, वळण रस्ते, व गांवे या ठिकाणी)
वाहतुकीची शिस्त लावणे.
विटा शहर मोठे झाल्याने शहरातून रहदारी वाढली आहे. तसेच शहरातून महामार्गही गेलेले आहेत. याला पर्याय म्हणून विटा शहरालगत लवकरात लवकर रिंग रोड करणे.
0 Comments