डॉ.जहीर काझी यांना राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान* *अंजुमन-ए-इस्लाम या वर्षी 150 वर्ष साजरे करणार*

 *डॉ.जहीर काझी यांना राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान*

*अंजुमन-ए-इस्लाम या वर्षी 150 वर्ष साजरे करणार*






सोलापूर- मुंबईसह सगळ्या महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी अंजुमन-ए-इस्लामच्यावतीने वेगवेगळ्या शैक्षणिक ज्ञान दिले जाते त्यामुळेच अध्यक्ष डॉ. झहीर काझी यांना राज्यपाल भगतसिंग शेयारी यांच्या हस्ते महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार मिडडे या संध्याकाळच्या वृत्तपत्राने जाहीर केला होता. या कार्यक्रमास अभिनेता श्रेयससह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावर्षी अंजुमन-ए-इस्लामला 150 व्या वर्धापन दिनानिमित्त 21 फेब्रुवारीपासून माजी विद्यार्थ्यांचा मेळाव्यासह वर्ष भर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी जगभरातून एक लाखाहून अधिक माजी विद्यार्थी येण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमासाठी स्टेडियम बुक करण्याची योजना असल्याची माहिती अंजुमन इस्लामचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉ. जहीर काझी यांनी दिली. 149 वर्षांपूर्वी मुंबईत अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU)ची स्थापना होण्याच्या एक वर्ष आधी, 21 फेब्रुवारी 1874 रोजी पुरोगामी मुस्लिम विचारवंतांनी मुलांसाठी पहिली उर्दू शाळेची स्थापना केली. अंजुमन इस्लामच्या रूपाने एक माध्यम शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मुस्लीम समाजात आधुनिक शिक्षण देण्याची आता वेळ आली आहे, या विचाराने बॉम्बे प्रांतातील डॉ.उमर खाडीजवळ बाबला टाकी येथे एका छोट्याशा इमारतीत हायस्कूल सुरू करण्यात आले. त्यावेळी 130 विद्यार्थ्यांना तीन शिक्षकांची अध्यनाच्या धडे देण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती.

उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करणार आहे, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना समारोप समारंभाचे अध्यक्षस्थानी आमंत्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापुरात फॉर्मसी, लॉ कॉलेज व बी.एस्सीचे महाविद्यालय

येत्या शैक्षणिक वर्षापासून सोलापुरात होटगी येथे अंजुमने इस्लाम, मुंबईच्यावतीने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी फॉर्मसी, लॉ कॉलेज व बी.एस्सी. हे तीन विद्या शाखा सुरू करणार आहे. याचे काम शेवटच्या टप्प्यात असून लवकरच पायभारणी समारंभ करून महाविद्यालयाच्या बांधकामाला सुरू करण्यात येईल, अशी माहिती अंजुमने इस्लाम मुंबईचे सदस्य व सोलापूरचे को-ऑर्डिनेटर रियाज पीरजादे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments