कृषि आधारित उद्योग उभारणीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी प्रस्ताव सादर करावेत · 22 फेब्रुवारीपर्यंत सादर करता येणार प्रस्ताव · ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत 60 टक्के पर्यंत अनुदान

 

कृषि आधारित उद्योग उभारणीसाठी

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी प्रस्ताव सादर करावेत

·      22 फेब्रुवारीपर्यंत सादर करता येणार प्रस्ताव

·      ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत 60 टक्के पर्यंत अनुदान







लातूरदि. 1(जिमाका) : जागतिक बँक अर्थसहाय्यीत बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत कृषि आधारित उद्योग उभारणीसाठी उत्पादक भागीदारी उपप्रकल्प राबविणेसाठी शेतकरी उत्पादक कंपनी संस्थांनी 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा अंमलबजावणी कक्षाचे प्रमुख तथा आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे. या उपप्रकल्पांना स्मार्ट प्रकल्पातून 60 टक्के पर्यंत अनुदान देय असेल.

अर्जाचा नमुनाअर्ज कसा करावाअर्ज करणाऱ्या संस्थांच्या पात्रतेचे निकषउपप्रकल्प राबविणेबाबतच्या अटी व शर्ती इत्यादी बाबतची माहिती जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील आत्मा कार्यालयात उपलब्ध आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी पाचपर्यंत आहे. हे अर्ज जिल्हा अंमलबजावणी कक्ष तथा प्रकल्प संचालक आत्मा लातूर पत्ता- मध्यवर्ती प्रशासकिय इमारतजुने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळलातूर-413512 या पत्त्यावर सादर करावेत. विलंबाने प्राप्त प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही. पोस्टाने अथवा अन्य कारणामुळे होणाऱ्या विलंबास आत्मा कार्यालय जबाबदार राहणार नाही. अधिक माहितीसाठी श्रीराम हेलाले (भ्रमणध्वनी क्र. 8275179717) यांच्याशी संपर्क साधून लातूर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अर्ज करण्याचे आवाहन श्री. गावसाने यांनी केले आहे.

****

Post a Comment

0 Comments