*उर्दू माध्यमच्या विद्यार्थ्यांनी मराठी शिकावे : प्राचार्य डॉ. तांबोळी
सोलापूर- खादिमान-ए-उर्दू फोरम, सोलापूरच्यावतीने अशर-ए-उर्दू २०२३चे आयोजन करण्यात आले आहे. यात उर्दू माध्यामच्या विद्यार्थ्यांना मराठी शिकण्याची इच्छा व्हावी म्हणून "उर्दू-मराठी पर्यायी शब्द स्पर्धा"चे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर सोशल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इक्बाल तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून हाजी महेबुब कुमठे यांच्यासह फोरमचे सचिव अब्दुल मन्नान शेख, संयोजक रफिक खान, संचालक इक्बाल बागबान, माजी मुख्याध्यापक खलील शेख आदी उपस्थित होते.
प्रारंभी याह्या अशफाक आळंदकर यांच्या पवित्र कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांचा परिचय खजिनदार नसिरुद्दीन आळंदकर अशरफी यांनी करून दिला. सेक्रेटरी अब्दुल मन्नान शेख यांनी फोरम गेल्या सात वर्षांपासून उर्दू माध्यमातील शिक्षणाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी काय काय कार्य केले हे सांगितले. आजची स्पर्धा उर्दू आणि मराठी भाषेचा शब्दसंग्रह वाढवून विद्यार्थ्यांमध्ये भाषांतर कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. भाषांतरामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर आणि उपजीविका घडवण्यासही मदत होऊ शकते.
अध्यक्षीय भाषणात डॉ.इकबाल तांबोळी म्हणाले की, उर्दू माध्यमच्या विद्यार्थ्यांनी सुध्दा मराठी शिकली पाहिजे. आपण ज्या राज्यात राहतो त्याची बोलीभाषा अवगत करणे हे या राज्याच्या प्रत्येक नागरिकांना ही भाषा येणे अवगत आहे. उर्दू भाषेबाबत ते म्हणाले की, उर्दू भाषा ही या देशाची भाषा आहे. या भाषेतून महान साहित्य निर्माण झाले आहे. स्वातंत्र्य चळवळीत उर्दूचा मोठा वाटा होता. उर्दूच्या क्रांतिकारी घोषणांनी लोकांमध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण झाली. उर्दूचा प्रत्येक शब्द शस्त्र म्हणून कामाला आला. उर्दू राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देते.
या स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयाच्या एकूण 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व त्यांच्या याचवेळी विद्यार्थ्यांना वर्गात बसून उर्दू आणि मराठी शब्दांचे अर्थ लिहिण्याची स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी समन्वयक अलीमुद्दीन दंडोती, तल्हा शफी कॅप्टन, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नासिरोद्दीन आळंदकर यांनी केले तर आभार रफिक खान यांनी आभार मानले.
.jpeg)
.jpeg)
0 Comments