*पेंटर चौक ते जमखंडी पूलपर्यंतचा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी*
*आ. प्रणितीताई शिंदे यांच्याकडे तेलंगी पाच्छा पेठ येथील नागरिकांचे निवेदनाद्वारे मागणी*
सोलापूर- तेलंगी पाच्छा पेठ येथील नागरिकांनी आ. प्रणितीताई शिंदे यांना एका निवेदनाद्वारे पेंटर चौक ते जमखंडी पूलापर्यंतचा रस्ता आणि लगत असलेल्या चार बोळांचा रस्ता अत्यंत खराब झालेला असून येथे ये-जा करणे अवघड झाले आहे. याच रस्त्यालगत जेलरोड पोलीस स्टेशन, सुभाष उद्यान, मंदिर, मस्जिद, शाळा. व महानगरपालिका जिजामाता हॉस्पिटल असून येथे प्रसूतीसाठी महिलांची नेहमी येत असतात. त्यामुळे येथे रुग्णवाहिकांची वर्दळ भरपूर असते. खराब असल्यामुळे रस्त्यावर पूर्ण धुळीचा वातावरण निर्माण झालेला आहे त्यामुळे लहान बाळांच्या व नागरिकांच्या आरोग्याला खूप धोका निर्माण झालेला आहे.तरी हे रस्ता लवकरात दुरुस्त करण्यात यावे, असा निवेदन आ. प्रणितीताई शिंदे यांना तेलंगी पाच्छा पेठ येथील नागरिकांनी दिला आहे.
तसेच या निवेदनात जमखंडी पुल ते भारतीय चौक च्या नाला सफाई, जिजामाता हॉस्पिटल व सुभाष उद्यान ची सुशोभीकरण करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. यावेळी येथील नागरिक नाईकवाडी जनाब,जब्बारभाई माशाळ, आसिफ बागवान, आबीदहुसेन रायली, नदीम तुळजापूरे, सागर जंगू, शंकरअण्णा, आकीब बागवान, इदुल्ला बद्दी , इक्बाल बागबान, बशीर कडप्पा, अंबादास गुर्रम, अकबर चांदा, बाबा जकलेर व भारतीय अमन ग्रुपचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
.jpeg)
0 Comments