माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
प्रभा केअर सेंटरला दिली भेट
डॉ. मनोज देशमुख व डॉ. देवाशिष रुईकर
यांच्या अभिनव सेवाभावी उपक्रमाचे केले कौतूक
लातूर प्रतिनिधी : मंगळवार दि १४ फेब्रुवारी २०२३
लातूर शहरात औसा रोड परिसरात डॉ. मनोज देशमुख व डॉ. देवाशिष रुईकर यांनी
ज्येष्ठ नागरीक तसेच निराधारांची सुश्रुषा करण्यासाठी उभारलेल्या प्रभा
केअर सेंटरला राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व
लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
मंगळवार दि. १४ फेब्रुवारी २३ रोजी सकाळी भेट दिली. डॉ. मंडळींनी अभिनव
संकल्पनेतून चालवलेल्या या सेवाभावी कार्याची माहिती जाणून घेतली, या
सेंटरमध्ये ज्येष्ठ नागरिक निराधार नागरीकासाठी मुंबई, पुणेच्या धर्तीवर
येथे उत्तम सोयीसुविधा दिल्याबद्दल त्यांनी कौतुक करून त्यांचे अभिनंदन
केले.
यावेळी माजी महापौर दिपक सुळ, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष
किरण जाधव, विलास को.ऑपरेटीव्ह बॅकेचे व्हा.चेअरमन समद पटेल, टवेन्टिवन
शुगर्स ली.चे व्हा. चेअरमन विजय देशमुख, माजी नगरसेवक रवीशंकर जाधव, सचिन
बंडापले, लातूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, पत्रकार राम जेवरे,
पत्रकार हरी तुगावकर, गणेश देशमुख, डॉ.जयंत पाटील, डॉ. माधव किरवले, डॉ.
विनोद कोराळे, डॉ. शांतीलाल शर्मा, संतोष देशमुख, हंसराज जाधव, प्रा.संजय
जगताप, डॉ. महेश सांडूर, प्रवीण घोटाळे, पुनीत पाटील, डॉ. मनोजकुमार
भडके, डॉ. संदीप क्षीरसागर, विनोद बेलकुंदे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध
पदाधिकारी उपस्थित होते.
मौजे पोमादेवी जवळगा ता. औसा येथील धनगर कुटुंबातील व्यक्तींना बेदम मारहाण
" समाजचिंतक " पुस्तकाचे 16 फेब्रुवारीस माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते प्रकाशन
लातूर - विजय शंकरराव चव्हाण लिखीत " समाजचिंतक " या मुक्तरंग प्रकाशनच्या वतीने काढण्यात आलेल्या पुस्तकामध्ये देश तथा राज्यातील दिग्ग्ज राजकारणी मा.खा. शरदचंद्रजी पवार , अध्यक्ष राष्ट्रवादी काॅन्ग्रेस पक्ष , मा.शिवराजजी पाटील चाकुरकर माजी लोकसभा अध्यक्ष , माजी मुख्यमंत्री कै.विलासरावजी देशमुख , माजी सहकारमंत्री कै .केशवरावजी सोनवणे , कै.आमदार वसंतरावजी काळे ,मराठवाडा पदवीधर व शिक्षक मतदार संघ, माजी खासदार व कुलगुरू जनार्दनजी वाघमारे , केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी , माजी खासदार डाॅ. गोपाळरावजी पाटील , संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे नेतै कै.भाई उद्धवरावजी पाटील, यांच्यासह राज्यातील सहित्य,संस्कृती, शिक्षण,सहकार,प्रकाशन,पत्रकारिता,यासोबतच धार्मिक व सामाजिक क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्यकरणाऱ्या व्यक्तीच्या चिंतनशील प्रयोगाचा आढावा या पुस्तिकेत घेण्यात आला आहे.
हे पुस्तक मा. शरदचंद्रजी पवार यांना अर्पण करण्यात आले असून याचा प्रकाशन सोहळा देशाचे माजी गृहमंत्री तथा माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्याहस्ते भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात संपन्न होत असून या प्रकाशम सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री विट्टल रुक्मिणी मंदिर पंढरपूर चे सह अध्यक्ष गुरुवर्य ह.भ.प. गहिनिनाथ महाराज औसेकर हे असणार आहेत. यावेळी माजी खा डॉ जनार्धन वाघमारे,आ विक्रम काळे,माजी प्राचार्य नागोराव कुंभार, प्रा डॉ शेषेराव मोहिते,प्रा डॉ रंजित जाधव,भाई धनंजय उद्धवराव पाटील,यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे. गुरुवार दि 16 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 6: 30 वाजता डॉ भालचंद्र ब्लड बँक ,एस .टी. स्टँड च्या बाजूला, लातूर येथे हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.
तरी या प्रकाशन सोहळयला उपस्थित रहावे आसे आवाहन प्रकाशन सोहळा समितीचे संयोजक प्रा डॉ दिलीप गुंजरगे, प्रा शिवाजी काळे,ऍड वसंत उगले,अविनाश चव्हाण,पांडुरंग देडे,अरविद कांबळे,डॉ हरीश चव्हाण,विवेक सौताडेकर,प्रा सतीश इंगळे,प्रताप माने पाटील,बळीराम पानढवळे,मधुकरराव पाटील,प्रा उदय पाटील,प्रा अर्जुन जाधव,विश्वनाथ होळकुंदे,दशरथ जाधव,बालाजी झाडके,यांनी केले आहे...
श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थान यात्रेच्या पूर्वतयारीचा
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी घेतला आढावा
· वाहतूक, सुरक्षा, स्वच्छतेविषयी कार्यवाहीच्या सूचना
लातूर, दि. 13 (जिमाका) : श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालयातर्फे आयोजित केली जाणारी महाशिवरात्री यात्रा 18 फेब्रुवारी ते 6 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आज आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत त्यांनी सर्व शासकीय विभाग आणि श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवालयाने समन्वयाने काम करून यात्रा यशस्वीपणे पार पाडण्याच्या सूचना केल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे सहायक आयुक्त तथा श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवालयाचे प्रशासक तथा निरीक्षक सचिन जांबुतकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनमंत वडगावे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, विक्रम गोजमगुंडे, अशोक भोसले यावेळी उपस्थित होते.
यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व शासकीय विभागांनी आपल्यावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडाव्यात. मंदिर परिसरात भाविकांच्या होणाऱ्या गर्दीचा विचार करून त्यांच्या वाहतूक, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे. मंदिर परिसरात पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन करून त्याद्वारे गर्दीचे नियंत्रण करावे. तसेच ध्वनिक्षेपक यंत्रणा आणि धोक्याची सूचना देणारी यंत्रणा, सुरक्षित वाहन पार्किंगची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या. तसेच अन्न व औषध प्रशासनाने यात्रा कालावधीत विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांचे वेळोवेळी नमुने घेवून तपासणी करावी. विषबाधेसारखे प्रकार टाळावेत, असे त्यांनी सांगितले.
मंदिर परिसरात धोक्याची सूचना देण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्व परिसरात पुरेसा बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिली. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. येथील आनंद मेळाव्यात उभारण्यात येणाऱ्या साहित्याचे इलेक्ट्रॉनिक आणि मॅकेनिक फिटनेस तपासण्याची कार्यवाही करायच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
महानगरपालिकेमार्फत भाविकांच्या सोयीसाठी बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच रस्ते, स्वच्छता व इतर बाबींचेही नियोजन करण्यात आल्याचे महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. ढगे यांनी विविध शासकीय विभागांवर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांची माहिती दिली.
*****



0 Comments