लता मंगेशकर प्रथम स्मृती दिन- एक यादगार कार्यक्रम 'अशर-ए-उर्दूमध्ये खादिमाने उर्दू फोरमतर्फे यादे रफतगाँ'

 लता मंगेशकर प्रथम स्मृती दिन- एक यादगार कार्यक्रम 

'अशर-ए-उर्दूमध्ये खादिमाने उर्दू फोरमतर्फे यादे रफतगाँ'





सोलापूर- अशर-ए-उर्दू २०२३ निमित्त 'यादे रफतगाँ' या श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन हिराचंद नेमचंद वाचनालय- संगीत विभाग आणि खादिमाने उर्दू फोरम यांच्यातर्फे “लता मंगेशकर यांनी गायलेल्या फिल्मी आणि गैर-फिल्मी गीतांवर“ एक अनोखा कार्यक्रम नुकताच, ३ फेब्रुवारी २०२३ रोजी वाचनालयाच्या अम्फी थियेटर येथे संपन्न झाला. भारतरत्न लता मंगेशकर आणि उर्दूचे अभ्यासक साहित्यिक श्री गोपीचंद नारंग यांना श्रद्धांजली वाहण्याचे आणि स्मृती जागवण्याचे ओचित्य या कार्यक्रमात होते. उर्दूच्या विकासासाठी कार्यरत खादिमाने उर्दू ही संस्था आणि संगीत संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने सादर या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या उर्दू गजला ऐकवण्यात आल्या. त्याचे अर्थ उलगडत डॉ. अब्दुल रशीद शेख यांनी प्रत्येक गझलवर प्रभावी भाष्य केले. प्रत्येक गझल त्यांनी स्वतंत्र उलगडली आणी अवघड जागाचे अर्थ स्पष्ट केले, आणि गझलचे व्याकरण देखील.... 

कार्यक्रमात सुरुवातीला श्री नसीर आळंदकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाचे स्वारूप स्पष्ट केले. खादिमाने उर्दूचे अध्यक्ष यांनी सांगितले की, “ लता मंगेशकर आणि डॉ.गोपीचंद नारंग हे दोघेही जगात उर्दूचे दूत म्हणून ओळखले जातील. लता मंगेशकर यांनी उर्दू उच्चार नेमके यावेत यासाठी विशेष अभ्यास केला होता. त्यांच्या जाण्यामुळे उर्दूचे मोठे नुकसान झाले आहे” असे अध्यक्ष श्री विकार शेख यांनी सांगितले”

रेकोर्ड कलेक्टर्स चे श्री. मोहन सोहोनी आणि जयंत राळेरासकर यांनी केलेल्या निवेदनात चित्रपटातील गझल कशी होती याची आठवण करून दिली. इतर काही रंजक किस्से आणि माहिती देत निवेदन केले. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. श्री विकार शेख यांनी देखील निवेदनात साथ केली. अध्यक्षीय भाषणात हिराचंद नेमचंद वाचनालयाचे कार्यवाह डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी सोलापूरचे बहुभाषिक वैविध्य स्पष्ट केले. कार्यक्रमात मिर्झा गालिब, इक्बाल, मीर तकी मीर, नक्ष लायालपुरी, साहीर लुधियानवी, मजरूह, गुलजार इत्यादींच्या फिल्मी आणि गैर-फिल्मी गझल ऐकवण्यात आल्या. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या सगळ्या अनवट गझल ऐकण्यासाठी रसिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. 

उर्दू फोरमचे सचिव श्री मन्नान शेख, संचालक श्री रफिक खान, प्रा. विलास बेत, अण्णासाहेब कोतली, नसीमा पठान, डॉ. तोष्णीवाल, डॉ. दिलीप बुरटे, आकाशवाणीचे निवेदक श्री अभिराम सराफ, डॉ. श्रीकांत कामतकर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments