*जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक शाळा मंद्रूपचे*
*तालुका व जिल्हास्तरावर क्रीडा स्पर्धेत यश*
मंद्रुप- उर्दु दिनानिमित्त घेण्यात आलेल्या तालुका व जिल्हा स्तर क्रीडा स्पर्धामध्ये जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक शाळा मंद्रूपने उज्जवल कामगिरी करत यश प्राप्त केले आहे. दक्षिण सोलापूर तालुकास्तरावर खो-खो या क्रीडा स्पर्धेत मुले गटात व मुली गटात प्रथम क्रमांक तर १०० मीटर धावणेमध्ये इयत्ता पाचवीचा हैदर मो. अली यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
तसेच
जिल्हास्तरावर मुलांचां खो-खो संघ यांनी जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक शाळा मुगळी अक्कलकोटला पराभूत करून जिल्हास्तर विजेता पटकविला तसेच या स्पर्धेत मुलींचा खो-खो संघ जिल्हास्तर उपविजेता ठरला आहे आणि १०० मीटर धावणेमध्ये इयत्ता पाचवीचा हैदर मो. अली यांनी दुसरा क्रमांक पटकावला.
प्रशिक्षक म्हणून पदवीधर शिक्षक कादर करजगी व अख्तर शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शाळेची मुख्यद्यापिका जहाँआरा तांबोळी, उपशिक्षिका बदरुंनिसा सगरी, फरजाना सय्यद, मेहमूद नवाज व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रसूल शिकलगार यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
.jpeg)
.jpeg)
0 Comments