साबरमती द ग्लोबल स्कूल वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरा
औसा
दि. २५- फेब्रुवारी रोजी साबरमती विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन “उडान” उत्साहात विद्यालयाच्या प्रांगणात साजरे करण्यात आले. या वेळी औसा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा.अभिमन्यू पवार साहेब प्रमुख पाहुणे व तसेच युकांचे प्रेरणास्थान अजितभैय्या कव्हेकर (नगरसेवक) आवर्जून उपस्थित राहिले संतोषभैय्या (भा ज पा जिल्हा प्रभारी ) तसेच सुधीर पोतदार संस्थेचे व्यवस्थापक मंडळ या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली
उपस्थितांचा सत्कार विद्यालयाचे व्यवस्थापक मंडळ व प्राचार्यांनी केले.प्रमुख उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले
विद्यालयाचे व्यवस्थापक संचालक “ यश बलदवा” यांनी प्रास्ताविक व विद्यालयाची जडण-घडण तसेच विद्यालयाच्या भावी वाटचालीविषयी माहिती दिली
प्रमुख मान्यवरांनी अनमोल आसे विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.व विद्यालयाच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सन.२०२१-२०२२ मधील विदयार्थ्यांचा बक्षीस समारंभ व गुणगौरव सोहळा सर्वसमक्ष प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आला
तसेच तालुका जिल्हा व राज्यपातळीवर क्रीडा सत्रात यश संपादन केलेल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला
आपल्या कसदार अभिनयाने विद्यार्थ्यांची विविध नृत्य,गायन,विनोदी बातम्या,वाचन करून प्रेक्षकांची मने जिंकली
कार्यक्रमाचे आभार प्राचार्य सीमा सरोज मॅम यांनी केले तसेच विद्यालयाच्या मुलांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साबरमती द ग्लोबल विद्यालयाचे व्यवस्थापक संचालक यश बलदवा प्राचार्य सीमा सरोज नृत्य शिक्षक संतोष भस्मे,शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी,पालक,विदयार्थी सिक्युरिटी पथक या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि कार्यक्रमाची सांगता “राष्ट्रगीताने” करणायत आली .
0 Comments