उर्दू भाषा विकास परिषद नवी दिल्ली फिरते पुस्तक वाहन दोन दिवस सोलापुरात

 उर्दू भाषा विकास परिषद नवी दिल्ली फिरते पुस्तक वाहन दोन दिवस सोलापुरात




सोलापूर- उर्दू भाषा विकास परिषद नवी दिल्ली यांच्यावतीने दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात फिरते पुस्तक वाहन प्रदर्शन आयोजन करण्यात येते.  आज शुक्रवार दि. २६ रोजी या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिध्द उर्दूचे ज्येष्ठ कवी बशीर परवाज यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी जिल्हा परिषद एज्युकेशन (माध्यमिक) ऑफिसर जावीद शेख, या पुस्तक वाहनाचे समन्वयक अतहर परवेज दफेदार, स्कूल बोर्डाचे सुपरवायझर निलोफर शेख, माजी प्राचार्य अ. जब्बार शेख, कवी सिराज सोलापुरी, मुख्याध्यापक आसिफ इक्बाल, अ. मन्नान शेख, मीर अफजल आदी उपस्थित होते.
बशीर परवाज यांनी पुढे म्हणाले की, फिरते पुस्तक प्रदर्शनामध्ये उर्दू साहित्यातील सर्व साहित्यिकांची, कवी व लेखकांची कांदबरी, कविता, गझल पुस्तके असतात.  याचा लाभ सर्व उर्दू रसिकांनी घ्यावा.  
जावीद शेख यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, हे पुस्तक वाहनामध्ये जे पुस्तके असतात ते क्वचीत आपल्याला भेटतात, तरी आपण जास्तीत खरेदी करावे, असे आवाहन केले.



यावेळी इक्बाल प्रंडे, मौला मुदेल, इरफान पटेल, मौलाना खरादी,  मुश्ताक गदवाल,आकिद शेख, समीर निचलकर आदी उपस्थित होते.सुत्रसंचलन मुईज शेख यांनी केले.




Post a Comment

0 Comments