समाजसेवेतील समर्पित व्यक्तिमत्व-मुजफ्फर अली इनामदार
हज़ारो साल नर्गीस अपनी बे नुरी पे रोती है,बडी मुश्कील से होता है चमन मे दीदावर पैदा.
माणसाला त्याचे कर्म हे मोठे बनवत असतात.पैसा,प्रसिध्दी,सुख तथा समाधान हे तर कर्मानूसार, कार्यानूसार,मेहनती नूसार आणि माणूसकीच्या मोठेपणा नूसार आपोआप आपल्या जवळ येत असतात. तसेच कांही माणसं अत्तराच्या बाटलीसारख्या असतात त्या तुमच्याजवळ असोत किंवा नसोत त्यांच्या आठवणींचा सुगंध नेहमी तुमच्या आयुष्यात दरवळत असतो. अशाच व्यक्तीमत्वापैकी एक आदर्श समाजसेवक,एक उत्तम राजकारणी,एम.आय.एम.चे ज्येष्ठ नेते मा.सय्यद मुजफ्फरअली हाशमअली इनामदार होय.सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांच्या अंगी विविध गुणांचा ठेवा आहे, मुजफ्फर अली इनामदार हे सर्वगुणसंपन्न व्यक्ती असून एक उत्तम व्यावसायिक,एक कृतीशिल शेतकरी सुध्दा आहेत.सय्यद मुजफ्फर अली इनामदार म्हणजेच औशाची एम.आय.एम.हे गणितच त्यांच्यासाठी लागू होतं.त्यांनी त्यांच्या राजकीय जिवनाच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्यावर भर देत अनेक आंदोलने यशस्वी केली आहेत. सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी राज्य सरकारने मौलाना आजाद आर्थिक विकास महामंडळस भरीव निधी द्यावे यासाठी औसा तहसिलदार यांना वेळो-वेळी निवेदन देऊन सतत पाठपुरावा केलेला आहे,पंडित सुंदरलाल कमिटीच्या शिफारस लागू करण्यासाठी औसा तहसिलदार यांना निवेदन अनेक वेळा दिलेली आहेत
.औसा शहरातील रखडलेले मुख्य रस्त्याचे काम तसेच जामा मस्जिद ते हनुमान मंदीर टप्पा क्र.०३ रस्ता रुंदीकरणाचे काम त्वरीत करणे संदर्भात निवेदन, महाराष्ट्र राज्यातील विद्युत महामंडळाकडून जनतेची होणारी पिळवणूक व लाईट बिलाच्या नावाखाली लुट थांबविणे बाबत मा. ना.तनपुरे साहेब मा.राज्यमंत्री म.रा.यांना निवेदन,खासदार ओवेसी यांच्या निवासस्थानी हल्ला करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून औसा तहसिलदार यांना निवेदन देऊन प्रशासनाला जागे करण्याचं कार्य सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी नेहमी केलं आहे. तसेच खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात महाबीज बियाणे व डिएपी खत उपलब्ध करणे बाबत निवेदन, ६ डिसेंबर निषेध तथा बाबरी मस्जिद पुर्णनिर्माण करण्यासाठी औसा तहसिलदार यांना निवेदन देऊन सजग करण्याचं कार्य नेहमी या अवलियाने केली आहेत.सर्वात महत्त्वाचं म्हणजे औसा शहरातील जामा मस्जिद ते हनुमान मंदीर टप्पा क्र.०३ साठी रास्ता रोको आंदोलन, लॉकडाऊन काळातील लाईटबिल माफ करण्यात यावे यासाठी बोंब मारो आंदोलन करुन अख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधण्याचं कार्य सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांनी केलं.खरंतर राजकारणासोबतच समाजसेवेचा वसा घेऊन ते नेहमी गरवंतासाठी धडपडत असतात.माझ्या परीवाराशी आत्मियतेची नाळ जोडुन नेहमी माझ्या पाठीशी राहणाऱ्या माझ्या या मामाश्रीची समाजसेवा ही अत्यंत अनमोल आहे कि ज्याचं मोल कोणीही करु शकणार नाही कारण निस्वार्थ मनाने कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपलं समाजकार्य करत जाणं हे मामाश्रीचं लाख मोलाचं कार्य आहे. स्वतः कमी शिक्षित असून सुध्दा सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्चशिक्षण दिले आहे. मोठा मुलगा सय्यद मुब्बशिर हा सिव्हील इंजिनिअर असून धाकटा सय्यद मुज्जकिर ने एल.एल.बी.ची पदवी घेतली आहे. दिमतीला एक इंजिनिअर आणि एक वकील तयार करुन मामाश्रींनी आपली शिक्षणाची हौस ही मुलांच्या शिक्षणातून पुर्ण केली ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे.परंतु खंत सुद्धा आहे की एम.आय.एम.पक्षासाठी अहोरात्र झटणाऱ्या या व्यक्तिमत्वाला पक्ष श्रेष्टीने कधी ज्या हक्काच्या पदावर हा गडी पाहिजे होता तिथं स्थान दिलं नाही,ही शोकांतिका आहे.असो,२७ मे सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांचा वाढदिवस !
यानिमित्ताने आदरणीय मामाश्री सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांच्यासाठी अल्लाह तआला जवळ मी दुवा करतो की त्यांना निरोगी आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या सर्व इच्छा-आकांक्षा पुर्ण होवो.शेवटी एवढेच की हर राह आसान हो,हर राह पर खुशियाँ हो, हर दिन खुबसुरत हो ऐसा ही पुरा जीवन हो.अल्लाह तआला से यहीं दुवा करते हैं की अल्लाह आपको लबी उम्र,सेहत,शौहरत और बुलंदी से नवाजे...आमीन!
व्यक्ति-विशेष
ॲड.इकबाल रसूलसाब शेख
राहत,गणेश नगर,औसा.
Mo.9545253786









0 Comments