जमाअते इस्लामी हिंद सोलापूर तर्फे सोमवारी निर्मलकुमार फडकुले सभागृहात ईद मिलन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ शंकर नवले सरांनी मार्गदर्शन केले. गांवा गांवाध्ये सर्व धर्मात, सर्व जातीत कसा प्रेमभाव आहे, सलोखा आहे हे त्यांनी सोदाहरण सांगितले .विशेषतः तुकाराम महाराजांची दिंडी निघताना, माऊली ची दिंडी मार्गस्थ होताना तसेच मोहरम मध्ये हिंदू मुस्लिम कशा पध्दतीने सहभाग नोंदवितात हे सांगितले . त्यांच्या व्याख्यानात त्यांनी एकमेकांशी प्रेमाने वागण्याचा आणि सलोखा राखण्याचा मोलाचा सल्ला दिला.
त्यानंतर अ करीम शेख नी सुप्रसिद्ध कवी सुरेश भटची मुहम्मद पैगंबरावर लिहिलेली "नात" अत्यंत सुरेल आणि दमदार आवाजात सादर केली.त्यामुळे सभागृहातील वातावरण भारावले.
संत साहित्याचे आणि इस्लाम चे गाढे अभ्यासक डॉ सय्यद रफिक जे पारनेरहून आले होते त्यांनी आपल्या ओघवती भाषेत ईद चे महत्त्व विशद केले.रोजा/ उपवास म्हणजे काय ह्याचे स्पष्टीकरण सोप्या भाषेत समजावून दिले.उपवास किंवा रोजाचा उद्देश ईशपरायणता किंवा पापभिरूपणा आहे आणि फक्त उपाशी राहूणे परमेश्वराला नको आहे तर हाताचा रोजा असतो म्हणजे हाताने अन्याय करू नये, जिभेचा रोजा म्हणजे तोंडाने वाईट बोलू नये, हे होय जर कुणी रोजा पाळतोय आणि किंवा एकादशीचा उपवास करतोय परंतु भ्रष्टाचारापासून स्वतःला वाचवत नसेल किंवा वाईट कृत्यापासून दूर होत नसेल तर त्याच्या रोजाचा किंवा उपवासाचा काहीच उपयोग नाही हे डॉक्टर साहेबांनी ठासून सांगितले .
जसे ईद च्या काळात म्हणजेच रमजान मध्ये रोजाचे महत्त्व आहे तसेच रमजान मध्येच पवित्र कुरान चे अवतरण झाल्यामुळे कुरआन चे महत्व आहे.कुरान ची शिकवण सांगताना त्यांनी कुरान च्या विविध आयतींचा (श्लोक ) दाखला दिला.कुरान हे अखिल मानवजातिसाठी आहे , हे त्यांनी आवर्जून सांगितले .
आज समाजात भ्रष्टाचार , अनैतिकता, दुजाभभाव, एकमेकाविषयी वैरभाव वाढलेला आहे.माणूस माणूस म्हणून राहीला नाही.आधुनिक शिक्षणाबरोबार नैतिकतेचे शिकवण देणे ,ही काळाची गरज आहे.प्रेमभाव, सलोखा वाढविण्यासाठी पैगंबरांच्या शिकवणीनुसार जीवन व्यतित करणे तसेच संताचे उपदेश आचरणात आणणे महत्वाचे आहे.
आपल्या ओजस्वी व्याख्यानात त्यांनी संत तुकाराम महाराजांचे अनेक अभंग तसेच कबीराचे दोहे श्रोत्यासमोर ठेवले.पसायदानची पहली ओळ उच्चारून तसेच कुरानची आयत सांगून विश्वाचा निर्माता एक आहे, स्पष्ट केले. समाजातात एकोपा सलोखा , सद्भावना वाढीस लागण्यास सर्वांनी हातभार लावावा ही विनंती त्यांनी केली.
ह्या कार्यक्रमाला सोलापूर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.महत्त्वाचे म्हणजे स्रियांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
कार्यक्रमानंतर सर्वांना शिरखुरमा देण्यात आला.
मंचावर जमाअते इस्लामी हिंद सोलापूरचे अध्यक्ष डॉ इस्माईल शेख उपस्थित होते.
सूत्रचालन आणि आभार प्रदर्शन शफिक काझी ह्यांनी केले.




0 Comments