पावसाळ्याच्या आत तिसऱ्या टप्पा रस्तारुंदीकरण करावे अन्यथा तात्पुरता रस्ता तरी तयार करावा
एमआयएमचे सय्यद मुजफ्फरअली ईनामदार यांची निवेदनाद्वारे मागणी
औसा : औसा शहरातील जामा मस्जीद ते लातूर वेस हनुमान मंदीर तिसरा टप्पपा रस्ता रुंदीकरण अनेक दिवसापासून रखडलेला असून वारंवार मागणी करुनही वेगवेगळी कारणे दाखवण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातील व तालुक्यातील जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे पावसाळ्याच्या आत औसा शहरातील तिसऱ्या टप्प्यातील रस्ता रुंदीकरण करावे अन्यथा विलंब होत असल्यास नागरिकांच्या सुविधेसाठी तात्पुरता रस्ता तरी तयार करावा अशी मागणी औसा एमआयएम प्रमुख सय्यद मुजफ्फर अली ईनामदार यांनी आज मुख्याधिकारी नगर परिषद यांना निवेदनाद्वारे केली आहे.
जामा मस्जीद ते लातूर वेस हनुमान मंदीर तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरण रखडल्यामुळे या रस्त्यावर नेहमी खड्डे पडलेले असता व रस्त्यावरुन नालीचे घाण पाणी साचलेले असते. वारंवार तात्पुरता रस्ता करण्यात यावा म्हणून मागणी करण्यात आली व त्यासाठी निविदा पण निघाली होती परंतु काही राजकीय व्यक्तींनी व लोकप्रतिनिधीं नी काम करायचे नाही असे आपल्या कार्यालयातून सांगण्यात आले. नगर पालिकेच्या आपल्या वादामुळे शहरातील जनतेची पिळवणूक करण्यात येत असून या राजकारणाचा सर्वसाधारण जनतेला त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. तरी सदरचा औसा शहरातील रखडलेला तिसऱ्या टप्प्यातील रस्ता रुंदीकरण करण्यात यावे अन्यथा विलंब होत असल्यास प्रशासकीय स्तरावर तात्पुरता रस्ता तरी औसेकरांना करुन शहरातील नागरिकांची खड्ड्यापासून मुक्तता करावी अन्यथा एमआयएमच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही सय्यद मुजफ्फर अली ईनामदार यांनी निवेदनात नमुद केले आहे.











0 Comments