कोरम पूर्ण नसताना स्वाक्षऱ्या घेऊन ग्रामसभा घेणाऱ्या सरपंचासह ग्रामविकास अधिकाऱ्यास ग्रामस्थांनी धरले धारेवर.
ग्रामसभा करावी लागली तहकूब.
शेख बी जी.
औसा.दि.26 तालुक्यातील मौजे भादा येथे मे महिन्यातील महत्त्वाची ग्रामसभा घेण्यास ग्रामपंचायतीने टाळाटाळ केली होती. 2 मे पासून तब्बल 25 दिवसानंतर 26 तारखेला ग्रामसभा असल्याचे सांगितले. ग्रामसभेला उपस्थित जनतेची संख्या मर्यादित असतानाही ओबडधोबड ग्रामसभा घेण्याच्या तयारीत असलेल्या ग्रामविकास अधिकारी माणिक सुर्यवंशी सह महिला सरपंच मीनाबाई दरेकर यांना येथील नागरिकांनी धारेवर धरले.
विना सुचक, अनुमोदक अध्यक्ष निवडीवर सुरुवातीला प्रश्न विचारत रामेश्वर पाटील यांनी ग्रामसभेला उपस्थित संख्येपेक्षा स्वाक्षरी रजिस्टर वर अधिक स्वाक्षऱ्या कशा घेतल्या?हा प्रश्न मांडला व तसा ठराव घ्यावा असे सांगितले. मांडलेल्या ठरावाला येथील ग्रामस्थांनी पूर्ण अनुमोदन दिले.
नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असलेल्या या ग्रामपंचायतीतील अधिकारी व नेते गुत्तेदारी कडे जास्त लक्ष असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला.
ही ग्रामसभा नियमाला धरून नसल्याने गावातील अधिकाधिक जनतेला बोलावून घ्यावी.ही होत असलेली नाटकी ग्रामसभा बंद करावी असे येथील जनतेने एकमुखी सांगितले. तेव्हा हीच ग्रामसभा पुढे 31 मे रोजी घेण्याचे ठरले.





0 Comments