कांग्रेस नेते बसवराज पाटलांच्या मुलाच्या शाही विवाह सोहळा थाटात संपन्न सोहळ्यास दिग्गजांनी लावली उपस्थिती.
राजीव गांधी नगर मुरुम --. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील यांचे सुपुत्र शरण पाटील यांच्या शाही विवाह सोहळ्यास राज्यातील दिग्गजांनी उपस्थिती लावली. अतिशय भव्य दिव्य सुंदर देखण्या प्रसन्न वातावरणात हा ऐतिहासिक शाही विवाह सोहळा पार पडला.यासंस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होउन वधु वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी राज्यातील कांग्रेस नेते व दिग्गज मंडळीची प्रमुख उपस्थिती होती .
या शाही विवाह सोहळ्यासाठी कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, शिवराज पाटील चाकूरकर माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण, मा. सुशीलकुमार शिंदे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मानिकराव ठाकरे,बाळासाहेब थोरात, अस्लम शेख, नसिम खान , प्रणिती शिंदे , भाई जगताप , मधुकर चव्हाण, सिद्धाराम म्हेत्रे, ,विश्वनाथ चाकोते , ,अतुल लोंढे गहीनिनाथ महाराज औसेकर सर्व मठांचे मठाधिपती महंत उपस्थित होते.







0 Comments