12 कोटी रूपये निधी दिलेल्या लामजना येथील शासकीय निवासी शाळेच्या बांधकामाची चौकशी करण्याचे समाज कल्याण आयुक्तांचे आदेश · बांधकाम, साहित्याच्या दर्जाविषयी व्यक्त केली नाराजी

 लामजना येथील शासकीय निवासी शाळेच्या बांधकामाची

चौकशी करण्याचे समाज कल्याण आयुक्तांचे आदेश

·        बांधकाम, साहित्याच्या दर्जाविषयी व्यक्त केली नाराजी







लातूर, दि. 22 (जिमाका): अनुसूचित जाती मुलांसाठी लामजना येथे उभारण्यात आलेल्या शासकीय निवासी शाळेच्या बांधकामची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले. समाज कल्याण विभागाच्यावतीने या शाळेसाठी बारा कोटी रुपये निधी देण्यात आला होता.

लामजना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती मुलांची शासकीय शाळेच्या इमारतीची  समाज कल्याण आयुक्तांनी बुधवारी पाहणी केली. यावेळी तेथील बांधकाम, तसेच इतर साहित्य नित्कृष्ट दर्जाचे आढळून आल्याने त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. इमारतीसाठी वापरण्यात आलेल्या सिमेंटचा दर्जा नित्कृष्ट असून पुरविण्यात आलेले कॉटजेवणाचे टेबलफरशी इत्यादी साहित्य तसेच इमारतीस लावण्यात आलेल्या रंगाच्या दर्जाबाबत समाज कल्याण आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली.

शासकीय विश्रामगृहात बुधवारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत समाज कल्याण आयुक्त डॉ. नारनवरे यांनी लामजना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती मुलांची शासकीय शाळेच्या बांधकामाच्या दर्जाची तपासणी करण्यासाठी समिती नेमावी. चौकशीचा अहवाल तात्काळ समाज कल्याण विभागास सादर करण्याच्या सूचना दिल्या.

Post a Comment

0 Comments